जनता विद्यालयात सायबर क्राईम रस्ते सुरक्षा व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम संपन्न 

✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा (दि.30 ऑगस्ट) :- 

 परिसरात सतत उपक्रम राबवणारे शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली जनता विद्यालय मध्ये आज सायबर क्राईम व रस्ते सुरक्षा तसेच शिष्यवृत्ती वाटप य कार्यक्रम संपन्न झाला.

 बायोस्टेट इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे जनता विद्यालयातील एकूण 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये याप्रमाणे एकूण 25000 मदत सदर कंपनीतर्फे करण्यात आली. त्याचप्रमाणे सायबर क्राईम वर रस्ते सुरक्षा हा कार्यक्रम रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत राबविण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रमोद ठोंबरे हे होते. प्रमुख मार्गदर्शक रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री दुर्गेशजी राजपूत हे होते. प्रमुख उपस्थिती मध्ये विद्यालयाचे स्थानिक सल्लागार श्री मदनराव गवते, साहेबराव गवते, सदाशिव शिंदे, भावसिंग सोळंके, बायस्टेट इंडिया लिमिटेड कंपनीचे मॅनेजर सतीश देशमुख साहेब, इंगळे साहेब, धंदर साहेब, शुभम शेवाळे, अजय पाटील शेवाळे, रामेश्वर पाटील गवते, सत्कारमूर्ती शंकरराव तरमळे तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कांताताई तरमळे, सुनील खंडारे, पत्रकार विठ्ठल भाऊ सोनुने, श्री झगरे, श्री अंभोरे व श्री मोरे, बाजार समिती संचालक श्री सुनील भाऊ गवते आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

 बायोस्टेट इंडिया लिमिटेड कंपनी तर्फे विद्यालयातील 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी अडीच हजार प्रमाणे 25 हजाराची मदत करण्यात आली, त्यांना त्याची प्रमाणपत्र व त्यांचे स्वागत करण्यात आले, या विद्यार्थ्यांमध्ये वर्ग 10 चे 10 विद्यार्थी लाभार्थी म्हणून होते, कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर सतीश देशमुख साहेब यांनी कंपनीचा हेतू व उपक्रम सांगितले.

सुनीलभाऊ खंडारे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे विदेश दौरा आटपून आलेले तरमळे दाम्पत्य यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.त्यांच्या कार्याविषयीं थोडक्यात माहिती जैष्ठ शिक्षक श्री पाटोळे सर यांनी दिली.

 महिला व बाल कल्याण अधिकारी श्री सपकाळ साहेब जिल्हा परिषद बुलढाणा हे सुद्धा कार्यक्रम साठी आवर्जून उपस्थित होते. बाल हक्क व बाल कायदा याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

मान्यवरांच्या हस्ते इको क्लब मार्फत सौं. प्रतिभा ठोंबरे यांनी दिलेल्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.

 रायपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री दुर्गेशजी राजपूत साहेब यांनी रस्ते सुरक्षा व सायबर क्राईम, बाल सुरक्षा यावर प्रामुख्याने प्रकाश टाकला, अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन तथा सूत्रसंचालन देविदास दळवी यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. सुधाकर सस्ते यांनी केले.

 फलक लेखन श्री असोलकर सर व खानंदे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिप्रमं चे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराजजी भाला, प्राचार्य प्रमोद ठोंबरे, पर्यवेक्षक आरसोडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बायो स्टेट इंडिया लिमिटेड चे सर्व पदाधिकारी व विद्यालयाच्या सर्व घटकांचे सहकार्य लाभले.