जगन्नाथ बाबा उप-बाजार समिती चंदनखेडा येथे इलेक्ट्रानिक वे-ब्रिज काटा लोकार्पण

🔹उप-बाजार समिती चंदनखेडा याची ओळख आजपासून जगन्नाथ बाबा उप-बाजार समिती चंदनखेडा…रविंद्र शिंदे

🔸शेतकरी यांच्या हिताकरीता कृषी उत्पन्न बाजार समिती कार्य करीत राहणार – सभापती भास्कर ताजणे

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.16 फेब्रुवारी) :- शेतकरी यांच्या हिताच्यादृष्टीने भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती अंतर्गत उप-बाजार समिती चंदनखेडा येथे 50 मेट्रीक टन इलेक्ट्रानीक वे-ब्रिज काटा यांचे दि. 16 ला सीडीसीसी बँक चंद्रपूरचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

  शेतकरी यांना आपले कृषी उपज जवळच विकता यावे याकरीता भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती अंतर्गत तालुक्यातील चंदनखेडा येथे उप-बाजार समिती आवार आहे. शेतकरी यांच्या कृषी उपज मध्ये वजनाचे हेरफेर होवू नये तसेच योग्य वजनाचा लाभ मिळावा तथा शेतकऱ्यांच्या वेळेची बचत व्हावी या उदांत हेतुने भद्रावती कृ.उ.बा.स. सभापती व संचालक मंडळानी ईलेक्ट्रानीक वे-ब्रिज काटा बसविण्या संबंधाने निर्णय घेत सभापती भास्कर ताजणे यांच्यासह संचालक मंडळाच्या प्रयत्नाने ईलेक्ट्रानिक वे-ब्रिज काटयाचे काम पुर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांकरीता वजन काटयाचे आज लोकार्पण करण्यात आले.

 या लोकार्पण कार्यक्रमास उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूरचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे हे उपस्थिती होते. प्रमुख पाहुण्यामध्ये कृ.उ.बा.स. संचालक उप-सभापती अश्लेषा मंगेश भोयर, बांधकाम सभापती गजानन उताणे, मनोहर आगलावे, विनोद घुगुल, शरद जांभुळकर, कान्होबा तिखट, ज्ञानेश्वर डुकरे, शांताबाई रासेकर, परमेश्वर ताजणे, शामदेव कापटे, मोहन भुक्या, प्रविन बांदुरकर, राजेंद्र डोंगे, अतुल जिवतोडे, भानुदास गायकवाड, अनिल चौधरी, राजु आसुटकर आदी उपस्थित होते.

 सर्व प्रथम कार्यक्रमाचे उद्घाटक रविंद्र शिंदे, सभापती भास्कर ताजणे व उपस्थित संचालक यांच्या हस्ते मंदीरात मारोती पुजन करण्यात आले. यानंतर रितसर संचालक मंडळ, उपस्थित व्यापारी वर्ग, शेतकरी बांधव व गावकरी यांच्या समक्ष इलेक्ट्रानिक वे-ब्रिज काटयाचे विधीवत पुजन करीत लोकार्पण करण्यात आले.

 उप-बाजार समिती चंदनखेडा यांची ओळख आजपासून सदगुरु जगन्नाथ बाबा उप-बाजार समिती चंदनखेडा ओळखले जाईल असे कार्यक्रमाचे उद्घाटक रविंद्र शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जाहीर केले व पुढेही शेतकऱ्यांच्या हितासाठी व न्याय देण्यासाठी सदैव कार्य करीत राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती कृ.उ.बा.स. सभापती भास्कर ताजणे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्य करीत राहील तसेच शेतकऱ्यांना न्याय, योग्य मोबदला देण्यासाठी कार्यरत राहील.

 या कार्यक्रम प्रसंगी भद्रावती माजी नगरसेवक नरेन्द्र पढाल, मुधोली सरपंच बंडू नन्नावरे, युवा सामाजिक कार्यकर्ते सुनिल मोरे, राहुल मालेकर, भद्रावती माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, राजू आस्वले, चांगदेव रोडे तसेच व्यापारी वर्ग प्रभाकर घोडमारे, जगदीश राऊत, शालीक घोडमारे, उध्दव भागवत, विकास मगरे, महेश घोडमारे तथा शेतकरी मंडळी उपस्थित होती.

 कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती प्र. सचिव नागेश पुनवटकर यांनी केले तसेच या लोकापर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती तथा उप-बाजार समिती चंदनखेडा येथील कर्मचारी वृंद यांनी मोलाची मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केले. भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती तथा उप-बाजार समिती चंदनखेडा तर्फे उपस्थितांचे आभार व्यक्त करीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.