जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान आयोजित महारक्तदान शिबीर

🔸वरोरा उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी केले रक्तदान

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.19 फेब्रुवारी) :- अनंत श्री.विभूषित जगतगुरु रामानंदाचार्य श्री.स्वामी नरेंद्रचार्याजी महाराज यांच्या प्रेरणेने स्व-स्वरूप संप्रदाय तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल,अनेमिया, थलेसेमेशा,हिमोफिलिया,ब्लड कॅन्सर,किडनी फेल्युअर पेशन्ट जास्त आढळतात.अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते.यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्याना रक्तबाटला देण्याचे सप्रदाया मार्फत निश्चित केले आहे.

     त्याअनुषंगाने अनंत श्री. विभूषित जगतगुरु रामानंदाचार्या श्री.स्वामी नरेंद्रचार्याजी महाराज जगतगुरु रामानंदाचार्या दक्षिण पीठ,नानिजधाम (महाराष्ट्र)जगतगुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान आयोजित महारक्तदान शिबीर 10 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या दरम्यान रक्तदान शिबिर चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यात येत असून 18 फेब्रुवारी। 2024 ला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले.जीवणज्योती रक्तपेढी केंद्र नागपूरचे डॉ.सत्यसिंग ,डॉ. सचिन कासार,डॉ.प्राची परिहार,वीरांगना गउपाले,अंकुशा डोमले,नेहा माडेवार,गजानन तराळे,डॉ.स्वप्नील,डॉ.दिनेश डोईफोडे या डॉक्टर चमुनी रक्तदात्यांच्या आरोग्याची योग्य तपासणी केली.जवळपास 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

रक्तदान शिबिराचे उदघाटन संतसंग चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्षा स्मिता श्रीधर लढी,प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कमिटी,सामाजिक कार्यकर्ते छोटुभाई शेख,शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा)मुकेश जीवतोडे,संचालक-आविष्कार कॉन्सल्टन्सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे प्रमुख मंगेश खंगार,आनंद नागरी बँक चंद्रपूर चे योगेश कातोरे,यांचे प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उदघाटन पार पडले.

     शिबीर यशस्वीतेसाठी संतसंग चे वरोरा तालुका प्रमुख श्रीकांत दादा पिंपलशेंडे,भद्रावती तालुका प्रमुख वंदनाताई उईके,महिलाप्रमुख वरोरा माधुरीताई खंगार,संजीवनी प्रमुख ओंकार एकोणकार,गोवर्धन काळे,खांडेकर,आदि संतसंग पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

वरोरा तालुक्यातील मोखाला,जामगाव,वरोरा,बोर्डा येथील मोठ्या प्रमाणात सतसंघ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.