✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)
पुणे(दि.13 ऑगस्ट) :- पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा, संभाजी पुरीगोसावी (छ.संभाजीनगर जिल्हा ) प्रतिनिधी. राज्य गृह विभागाने मागील काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्णता: झालेल्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, यामध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांचाही यामध्ये समावेश आहे.
तर त्यांच्या जागेवर डॉ. विजयकुमार राठोड यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांनी आज सकाळी पोलीस मुख्यालयात हजर राहून मावळते पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे, डॉ. विजयकुमार राठोड हे सध्या ठाणे शहरांच्या वाहतूक विभागांचे पोलीस उपायुक्त आहेत, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रामनाईक तांडा हाडोळी येथील असलेले डॉ. राठोड यांनी राज्यांत विविध जिल्ह्यामध्ये सेवा बजावली आहे, ठाण्यामध्ये काही महिने परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त राहिल्यानंतर त्यांना वाहतूक विभागांचा पदभार देण्यात आला होता.
आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर राठोड राज्यभर चर्चेत आले होते, सध्याचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी 20 एप्रिल 2022 रोजी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले होते, त्यांनी देखील आपल्या कार्यकाळामध्ये जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले.
यात प्रामुख्याने त्यांनी ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी सुरू केलेले मोफत कौशल्य प्रशिक्षण राबवून नोकरी मिळवून देण्याच्या मोहिमेला १०० पेक्षा अधिक बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली आहे, मात्र मनीष कलवानिया यांच्यासह श्रीकृष्ण कोकाटे,नंदकुमार ठाकूर यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्रपणे आदेश पुढील काही दिवसांतच काढण्यात येणार आहेत.