च्ंद्रपूर भाजपा ओबीसी मोर्चाची बैठक संपन्न

🔹प्रधानमंत्री मोदींच्या लोकपयोगी योजना ग्रामीण भागात पोहचवा – डॉ. अंकुश आगलावे

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.20 ऑगस्ट) :- चंद्रपूर भाजपा ओबीसी मोर्चाची बैठक दि. 18/08/2024 रोजी डॉ. शामप्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर येथे नुकतीच पार पडली. मागील दहा वर्षात पूर्ण केलेल्या विकास कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

       या बैठकीतला संबोधित करतांना डॉ. आगलावे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींजीनी गरीब, शेतकरी, कामगार, मजुर, दिव्यांग, महिला, आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या घटकांकरीता अनेक योजना राबविल्या आहे. त्या योजना तळगळातल्या लोकांपर्यंत पोहचल्या पाहीजे, तसेच लाडकी बहिण योजनांपासून एकही महिला बहीण वचित राहू नये या करीता प्रशासनाने सहकार्य करावे असे सांगितले.

        डॉ. आगलावे पुढे म्हणाले की, महीलांना एस.टी महामंडळाच्या बसेस मध्ये 50 टक्के प्रवासात सुट दिली आहे. लेक लाडकी योजना, महिलांना स्वतंत्र विधानसभेत आरक्षण मिळवून दिले. तसेच ओबीसी समाजाकरीता महायुती सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले आहे. त्यात ओबीसी करीता स्वतंत्र मंत्रालय असो की वैद्यकीय क्षेत्रात ओबीसींना आरक्षण असो असे अनेक समाजपयोगी व ओबीसीच्या सर्वांगिंण विकासासाठी निर्णय घेतले. आगलावे पुढेे म्हणाले की, येणा-या विधानसभेच्या निवडणुकीत विधानसभेच्या सहाही जागेवर भाजपाचा झेंडा रोवून विजयसंकल्प घेण्याचे आवाहन केले.  

           या बैठकीत मार्गदर्शक म्हणून हंसराजजी अहीर, राष्ट्रीय मागास आयोग,भारत सरकार, सुधीरभाऊ मुनगंटीवार, वने मत्स्य व सांस्कृतिक मंत्री. महाराष्ट्र शासन, संजय गाते, प्रदेशाध्यक्ष ओबीसी मोर्चा, भाजपा, हरीश शर्मा, भाजपा जिल्हाध्यक्ष, रविंद्रजी चव्हाण महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख, अशोक जीवतोडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री गुरूदास पिपरे, वंदना संतोषवार,महिला ओबीसी संयोजक, जिल्हा ओबीसी महामंत्री मनोज भूपाल इत्यादीची उपस्थिती होती. मंचावरील सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन यावेळी लाभले. या बैठकीत बावीस मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते, त्यात मंडळ अध्यक्ष, पदाधिकारींची मोठया संख्येत उपस्थित होते.