✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)
पुणे(दि.23 जून) :-
आज तब्बल चोवीस वर्षांनी दिघवद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील दहावी ब च्या वर्गातील मित्र व मैत्रिणी एकत्र आले . निमित्त होते शाळेविषयी व शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व धकाधकीच्या आयुष्यात एक दिवस आपल्या बालमित्रांना भेटण्यासाठी तब्बल चोवीस वर्षांनी सर्वजण एकत्र आले व एकमेकांना भेटले . सर्वांना संपर्क करण्याचे व एकत्र आणण्याचे महत्वपूर्ण काम संतोष आहेर व साधना खैरनार- दिघे यांनी केले.
आयुष्यात दहावी ही नव्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास ठरवणारी दिशादर्शक पायरी असते इथूनच विद्यार्थ्यांच्या जीवनाची दिशा बदलते. दहावीनंतर बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या वाटांनी निघून जातात व आपापल्या आवडीच्या क्षेत्रात स्वतः ची जडणघडण करतात . बऱ्याच वेळा एकमेकांचा संपर्क होत नाही मात्र डिजिटल युगात समाजमाध्यमांच्या वापराने सर्व जण पुन्हा एकत्र येतात याच डिजिटल माध्यमातून सर्व विध्यार्थी एकत्र आले . चांदवड येथील हॉटेल काठीयावाड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक सदाशिव शेडगे सर , उमाकान्त वारके , डी.एल. पवार , ए. एस.पवार , एस .एम.देवरे , अशोक निकम , रमण खुटे , तुळशीराम पेंढारी , संजय सोनवणे , वसंत जाधव , अर्जुन गांगुर्डे आदी शिक्षक उपस्थित होते .
त्यांचे माजी विध्यार्थी व आत्ताचे यशस्वी शेतकरी , सैनिक , शिक्षक , व्यावसायिक , नोकरदार , उद्योजक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सर्वजण भारावून गेले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सदाशिव शेडगे होते . आम्ही तुमच्यावर संस्कार केलेत तसेंच आता तुम्ही पुढच्या पिढीवर करावे व आपल्या आई – वडिलांची व देशाची सेवा करावी अशा भावना त्यांनी मांडल्या. याच सोबत सर्व शिक्षकांनी आपल्या भावना मांडल्या व सर्वांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन याच बॅच चे कवी दिनेश शिंदे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोपान गांगुर्डे , भाऊसाहेब गांगुर्डे , सुनील मापारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला अनिता पाटील , भारती भूतनार , शिना गांगुर्डे , अनिता गाढे , सविता नवले , शैला गांगुर्डे ,अनिता गांगुर्डे , प्रदीप शिलावट , संदीप जाधव , आनंदा शिंदे , दत्तू भोईटे , सुभाष पवार , खंडू नवले , शांताराम गांगुर्डे , नवनाथ झाल्टे , नवनाथ राजनोर , गोविंद गांगुर्डे , शिवाजी आहेर , गणेश गाढे , आत्माराम मापारी , अनिल मापारी ,दीपक गिरी , खंडेराव गांगुर्डे , गोपीनाथ कांगुणे आदी उपस्थित होते.