चोरा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

🔹बालगोपाल यांना विशेष बक्षीस वितरण

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.4 सप्टेंबर) :- भद्रावती तालुक्यात येत असलेल्या चोरा या गावांमध्ये दरवर्षी ताना पोळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यावर्षी देखील या पोळ्याचे औचित्य साधून अनेक बालगोपाल यांनी आपले नंदीबैल घेऊन तान्हा पोळ्या त सहभागी झाले होते.

प्रत्येक बालगोपालन यांनी आपली नंदीबैल सुशोभित सजवून परिसरात सुरू असलेल्या अन्याय अत्याचार बलात्कार शेतकऱ्यांवर होणारे अन्याय शेतकऱ्यांना हमीभाव द्या शेतकऱ्याची फसवणूक थांबवा शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा अशा अनेक संदेशांनी बालगोपालांनी अनेकांचे मने जिंकले करिता गावातील शेतकरी सेवा कृषी केंद्र चे संचालक श्री दिनेश बबनराव विरुटकर यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक बालगोपालाना पिण्याच्या पाण्याची बॉटल तसेच प्रथम दुतीय येणाऱ्या बालगोपालांना मिठाई व विशेष बक्षीस मिक्सर व अन्य बक्षीस देण्यात आले.

सदर हे बक्षीस येथील सरपंच सौ संगीता खीरटकर , उपसरपंच श्री विलास जीवतोडे ग्रामपंचायत सदस्य विलास नंनावरे , विजय घरत , पोलीस पाटील सागर सोनुर्ले, माजी सरपंच श्री गणेश दोडके, सौ शिल्पा शेरकुरे , माजी सभापती परशुराम जांभूडे , माऊली क्रीडा मंडळ चे अध्यक्ष ममलेश दोडके , राहुल भंडारे, इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी मोठे मोलाचे सहकार्य केले.