चेतन लुतडे यांची व्हॉईस ऑफ मीडिया वरोरा अध्यक्ष पदी निवड

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.25 डिसेंबर) :- चंद्रपूर जिल्हा व्हाईस ऑफ मीडिया चंद्रपुर ची आमसभा घेण्यात आली या सभेमध्ये जिल्हा अध्यक्ष तसेच सर्व तालुक्यातील अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली होती तर यात जिल्हा अध्यक्ष पदी श्री अनिल बाळसराफ यांची निवळ करण्यात आली तर वरोरा येतील युवा तडफदार संघटनेची योग्य कामगिरी बजावनारे व सदैव संघटनेसाठी तत्पर असणारे श्री चेतन लुतडे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. सदर ही निवड व्हॉईस ऑफ इंडिया चे प्रदेश कार्याध्यक्ष श्री मंगेश खाटीक सर , विदर्भ अध्यक्ष श्री किशोर कारंजेकर, प्रदेश उपाध्यक्ष श्री संजय पडोळे, ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगळी, प्रा. मणियार सर यांच्या नेतृत्वाखाली निवड प्रक्रिया घेण्यात आली.

यावेळी वरोरा येथील पत्रकार श्री अनिल पाटील , बालकदास मोटघरे , रवी खाडे, गोपाल निब्रड, हरीश केशवानी , सादिक थैम, अशोक घाडगे,अविनाश बन, सारथी ठाकूर , अनिल नोकरकर, नरेश साळवे, मनोज गाठले , सुरेश जाधव , बिंदू ताडे इत्यादी उपस्थित होते तर व्हॉईस ऑफ मीडिया वरोरा च्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या .