चिमूर वरोरा महामार्ग वर दोन तासांनी धावली वाहने. राळेगाव येथील आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद

🔸शेतकरी विद्यार्थी शेतमजूर शासकीय कर्मचारी यांचा आंदोलनाला पाठिंबा

🔹तीन महिन्यात कामाला सुरुवात करणार अशी ग्वाही तहसीलदार महोदय यांनी दिली

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.11 डिसेंबर) :-स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या राळेगाव येथे आज मोठ्या संख्येने रस्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाला गावातील तसेच गाव परिसरातील अनेक नागरिक शेतकरी शेतमजूर यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन आंदोलन यशस्वी केले… 

          सविस्तर वृत्त असे की वरोरा शेगाव चिमूर महामार्ग गेल्या अनेक दिवसापासून रखडला असून या रखडलेल्या कामामुळे तसेच अर्धवट कामकाजामुळे अनेक नागरिकांना मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत असून या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देऊन प्रवास करावा लागत आहे. 

या अर्धवट कामामुळे कच्च्या रस्त्यामुळे धुरीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना अनेक आजाराला तोंड देत सामोर जावे लागत आहे तसेच या रस्त्यावर दररोजचे छोटे-मोठे अपघात होत असून अनेक नागरिकांना प्रवाशांना स्वतःचा जीव गमवावा लागला तर काही नागरिकांना कायमची अपंगत्व स्वीकारावे लागले या मार्गावर अनेक अपघात होत असून देखील येथील स्थानिक संबंधित लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याची काम पूर्णतः बंदच आहे या अर्धवट कामामुळे अनेक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.

      तेव्हा प्रशासनाला जाग यावी याकरिता राळेगाव येथे आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते यात अनेकांनी आपला सहभाग दर्शवून आंदोलनाला समर्थन दिले.

 वरोरा चिमूर महामार्ग निर्मितीचे काम सदर एस आर के कंट्रक्शन कंपनी कडे सोपविण्यात आले होते परंतु या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गेले सात वर्ष लोटून देखील या मार्गाचे काम अपूर्णच आहे शिवाय काही महिन्यापासून येथील कंपनीचे पदाधिकारी तसेच कर्मचारी आपली कंपनी सोडून पो बारा झालेत.

त्यामुळे या कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच येथील असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ देण्यात यावे, तसेच दोन-तीन दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबाला तसेच अनाथ झालेल्या मुलाला वीस लाख रुपये आर्थिक मदत कंपनीकडून तात्काळ देण्यात यावी. तसेच रस्ता लागत असलेल्या रस्त्याच्या धुरीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.

 तसेच रखडलेले काम अर्धवट काम तात्काळ पूर्ण करून जनतेच्या सेविकरीता गुळगुळीत रस्ता तयार करण्यात यावा. अशा विविध मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले होते रस्ता रोको तसे चक्काजाम आंदोलन हे दोन तास चालले असून सर्व वाहने अडविण्यात आले असल्याने अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला तेव्हा प्रवाशांची तसेच आंदोलन करण्याचा त्रास मनस्ताप लक्षात घेता वरोरा येथील तहसीलदार श्री योगेश कौटकर यांनी तात्काळ आंदोलन स्थळी दाखल होऊन सर्व मागण्या लक्षात घेऊन तुमच्या सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करून येत्या तीन महिन्यात सर्व कामकाजाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले व आंदोलन समाप्त करण्यात आले सदर हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर जिल्हा चे जिल्हा प्रतिनिधी श्री शेरखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगाव येथील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत पार पाडला.

या आंदोलनाला कसल्याही प्रकारचे गालबोट न लागावे व हे आंदोलन शांततेत पार पाडावे याकरिता शेगाव येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडले.