✒️ योगेश मेश्राम चिमूर (मालेवाडा विशेष प्रतिनिधी)
चिमूर (दि.17 एप्रिल) :-
चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालया मध्ये सामाजिक समता पर्व अंतर्गत महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमाणी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रा. रोहित चांदेकर सर, प्रा. अरुण पिसे, प्रा . डॉ.निलेश ठवकर ,डॉ.मृणाल वऱ्हाडे आणि प्रा. विवेक माणिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रोहित चांदेकर यांनी भारतरत्न डॉ.बी. आर. आंबेडकरांनी शिक्षणाबद्दल आपली आवड, जिज्ञासा आणि अभ्यासाप्रती कठोर परिश्रम घेऊन स्वत:ला शैक्षणिक क्षेत्रात सक्षम बनवले.
त्यांच्या सामाजिक परिवर्तन आणि कार्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात उपस्थित प्रा. अरुण पिसे महापुरुषांचे विचार आपल्या जीवनात आचरणात आणून आपण स्वतःला कसे यशस्वी करू शकतो हे सांगितले.
प्रा. डॉ.निलेश ठवकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला जे संविधानाच्या मताधिकार प्रदान केले आहेत त्याचा वापर लोकशाही बळकट करणाऱ्या प्रतिनिधींना देवुन डॉ. आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भारत साकारता येईल याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. विवेक माणिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी गुण अंगीकारून स्वत:ला यशस्वी करावे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आमिर धमानी सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निस्वार्थी होते. ते नेहमी इतरांचा विचार करत होते . त्यांना नेहमीच जातीभेदाला सामोरे जावे लागले. त्यांनी जातीव्यवस्थेला नेहमीच विरोध केला.
कार्यक्रमाचे आयोजक डॉ. मृणाल वऱ्हाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत आणि वंचित व दुर्बल घटकांच्या समानता व विकासाबाबत विचार केल पाहिजे. महाविद्यालयीन विद्यार्थिनी कु. प्राजक्ता तांभरे यांनी महिला समता व शिक्षण या विषयावर व कु. समिक्षा मेश्राम हिने गाण सादर केले. संचालन कु. कोमल डहारे यांनी केले तर आभार प्रा. विवेक माणिक यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.