चिमूर तालुक्यातील नागरी सुविधा व शासकीय योजना फक्त कागदावरच

🔸शेतकरी नेते विनोद उमरे यांचा आरोप

🔹लोकप्रतिनिधी कडून फक्त हातांवर घडी तोंडावर बोट

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16 जून) :- 

ग्रामिण भरागरातील प्रत्येक समाजातील नागरीकांचे दैनंदीन जीवन उंचरावण्यासाठी शासन विविध योजनेच्या माध्यमातून निधि उपलब्ध करुन देत असतो.पण वास्तविक पाहता बऱ्याच ठिकाणी या निधीचा अपहार होतांना चिमूर तालुक्यात दिसत आहे.ग्रामीण भागात आज रोजी शिक्षणाचा आरोग्याचा पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेल्या आहे.अनेक गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन केल्या जात नाही. ग्रामसभा कागदांवर घेण्यात येत आहेत.

गावातील नागरिकांना महिलांना, युवकांना गरजेनुसार सुविधा मिळत नाहीत त्यामुळे गावातील नागरिकांना समस्या वाढत आहे.पथदिवे ,खरेदी, दुरुस्ती पाणी पुरवठा दुरुस्ती नाली सफाई ,अंगणवाडी साहीत्य खरेदी सीसी रस्ता, शौचालय घरकुल बांधकाम, शाळा दुरुस्ती अश्या मुलभूत सुविधांच्या विविध कामांच्या मोठ्या प्रमाणात निधिचा अपहार होत असल्याचे शेतकरी नेते विनोद उमरे यांनी म्हटले आहे.प्रत्येक गावांमध्ये आज घडीला रोजगाराचा प्रश्न खुप गंभीर झालेला आहे.रोजगार हमी योजनेच्या कामांत ठेकेदारी चे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे जलयुक्त शिवार ,रोजगार योजने सक्षम सारख्या राबवल्या जात नाहीत .

त्यामुळे योग्य नियोजन अभावी रोजगाराची प्रश्न गंभीर झालेल्या आहे.कृषी क्षेत्रांमध्ये वाढ होताना दिसून येत नाही कारण शेतकऱ्यांना पट्टे नाहीत.त्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही.प्रत्येक गावांमध्ये शेत रस्ता त्याची अडचण आहे.शेत रस्ते अतिक्रमण झाल्यामुळे सर्वसाधारण शेतकरी अडचणीत आला आहे.त्याला शेत माल शेतात ठेवावा लागत आहे.त्यामुळे शेत मालांचे नैसर्गीक आपत्ती किवा वन्य प्राण्यामुळे मोठे नुकसान होते आहे.ह्याचे मुळ म्हणजे प्रशासनाचा दिशाहीन व सुस्थ कारभार जबाबदार असल्याचे शेतकरी नेते विनोद उमरे यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागातील विकास साठी नेमणूक केलेले अधिकारी ग्रामसचिव/तलाठी/व इतर अधिकारी/कृषी सहाय्यक हे कर्मचारी संघटनेच्या जोराव मनमानी कारभार करत असल्याचे शेतकरी नेते विनोद उमरे यांनी म्हटले आहे.सेवा हमी कायद्याचा सक्षम वापर होताना दिसत नाही.नागरी समस्या वाढत आहे.त्यावर उपायोजना करणे गरजेचे आहे.शासकीय कर्मचारी ग्रामसेवक,तलाठी शासकीय मुख्यालयी काम न करता तालुकास्तरावर खाजगी कार्यालयाच्या माध्यमातून काम करताना दिसून येत आहेत.

त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शासकीय योजना त्यांच्या प्रयत्न पोहचत नाहीत.त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला खिळ बसली आहे.त्याव सक्षम उपययोजना करुन शासकीय कर्मचारी यांना त्यांच्या मुख्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे करावी व तालुका स्तरावरील खाजगी कार्यालय कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेकडून व शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.