🔸चिमूर तालुक्यातील उपकेंद्र येथे आरोग्य सेविका नाही.त्यामुळे आरोग्य यंत्रणा सलाईनवर प्रहार सेवक विनोद उमरे
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.25 ऑगस्ट) :- चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील उपकेंद्र येथे आरोग्य सेविका नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातीत उपकेंद्र येथे आरोग्य सेविका असतात. पण चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील उपकेंद्र येथे आरोग्य सेविका नसल्याने आरोग्य विषयी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
शासन आरोग्य यंत्रणेनेवर लाखो रुपये खर्च करते.ग्रामिण भागात आरोग्य यंत्रणा पोहोचावी व गोर-गरीबांना जनतेला आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात या उदात्त हेतूने शासनाने आरोग्य उपकेंद्राची निर्मिती केलेली आहे.मात्र चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील उपकेंद्र येथे आरोग्य सेविका नसल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडली असून आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रात्री-अहवरात्री तब्येत बिघडतात त्यामुळे रात्री बेरात्री रुग्ण आरोग्य उपकेंद्रात येतात.पण आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.लाखो रुपये खर्च करुन बांधलेले चिमूर तालुक्यातील उपकेंद्र नीहीकामी असल्याचे प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद यांनी म्हंटले आहे.