🔹अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान पंचनामे करुन तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान द्या
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.21 जुलै) :- चिमूर तालुक्यात मागील काही चार-पाच दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने चिमूर तालुक्यातील सर्व नदी नाले तळे भरगोच्छ भरून वाहू लागली आहे.सतत धार-धार पावसामुळे सर्व परिसर जल मय झाला असून शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे.शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी राजा अधिक चिंता ग्रस्त झाला आहे.त्याकरिता चिमूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.
सविस्तर असे आहे की सतत होत असलेल्या आसमानी संकटामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. अतिदृष्टीमुळे झालेल्या नुकसान शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.काही दिवसापासून सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे चिमूर तालुक्यातील नादी नाले तलाव भरून वाहत असल्यामुळे चिमूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुराचे पाणी चक्र शेतातून वाहत असल्याने काही शेतात पाणी देखील साचून राहत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.यात सोयाबीन तूर कापूस यासारख्या पिकांची माती सह रोपटे वाहून गेली आहेत.त्यामुळे चिमूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केले.