✒️सुयोग सुरेश डांगे चिमूर (Chimur विशेष प्रतिनिधी)
चिमूर (दि.22 नोव्हेंबर) :- संविधान सन्मान दिन समारोह समितीच्या वतीने चिमुर येथील संविधान चौकात दिनांक २६ व २७ नोव्हेंबर रोजी अमृत महोत्सवी संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, गित गायन स्पर्धा व सायंकाळी ५ वाजता चिमुर नगरातील थोर महापुरुषांच्या स्मृती स्थळांना अभिवादन करण्यासाठी संविधान जनजागृती बाईक रॅली आयोजीत करण्यात आली आहे. सायंकाळी ७ वाजता सुप्रसिध्द प्रबोधनकार कवी-गायक रोशन राजा (नागपुर) यांचा जागर समतेचा संगितमय प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल.
दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रांगोळी स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा झाल्यानंतर दुपारी ३ वाजता राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे चंद्रपुर जिल्हा कार्याध्यक्ष रामदास कामडी यांच्या अध्यक्षतेखाली वैचारीक प्रबोधन तथा मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणुन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, चिमुरचे ठाणेदार संतोष बाकल उपस्थित राहणार आहेत.
यावेळी भारताचे संविधान संवर्धन व त्यापुढील आवाहने या विषयावर अकोल्याचे आकाश पवार, भारताच्या संविधानाप्रती महिलांची जागरुकता या विषयावर वर्धा येथील प्रा. डॉ. माधुरी झाडे, भारताच्या संविधानाची व्यापकता व सर्व धर्म हितसंवर्धन या विषयावर ब्रम्हपुरीचे प्रा. संजय मगर यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संविधान सन्मान दिन समारोह समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केले आहे.