✒️ रामदास ठुसे चिमूर (chimur प्रतिनिधी)
चिमूर (दि.20 एप्रिल) :-
चिमुर येथील जिजाऊ पतसंस्थेच्या सभागृहात नुकतीच मानवाधिकार सहाय्यता संघाची सभा संपन्न झाली. या सभेला अध्यक्ष म्हणुन राष्ट्रीय प्रभारी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र रवि धारणे, प्रमुख पाहुणे राष्ट्रीय महिला संघटन मंत्री तथा राष्ट्रीय प्रभारी (नारी शक्ती) हेमलताताई धारणे, जिल्हा प्रमुख सुहास पिंगे.
विदर्भ अध्यक्ष गुन्हे शाखा किशोर वैद्य, जिल्हा सचिव गुन्हे शाखा अनिल अडगुलवार, अध्यक्ष नारी शक्ती चिमुर दर्शनाताई बडगे, सचिव वर्षाताई घेटीया, जिल्हा महामंत्री संतोष क्षिरसागर, प्राचार्य सुधीर पोहनकर, महिला अध्यक्ष निताताई लांडगे, ग्रंथमित्र सुभाष शेषकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी रवि धारणे मार्गदर्शनात म्हणाले की, सहविचार सभेचे आयोजन करून त्यात मानवाधिकार सहाय्यता संघाचा उद्देश सांगुन कार्याविषयी माहिती दिली. आपला संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर एकवीस देशात पोहचलेला आहे. तसेच जिल्हाध्यक्ष सुहास पिंगे यांनी संघ सहाय्यक नियुक्तीबाबत मार्गदर्शन केले.
या सभेत एकुण ३० व्यक्तींना संघ सहाय्यक म्हणुन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रंथमित्र सुभाष शेषकर, भारतीताई गोडे, श्रीकांत मारगोनवार, महिमा कापसे, मिलींद जांभुळे, हेमराज दांडेकर, रमेश भोयर, प्रविण कावरे आदी मान्यवरांनी पाहुण्यांचे शाल व त्रिफळ, गुच्छ देवून स्वागत केले.
सभेचे संचालक चिमुर प्रभारी, प्राचार्य सुधीर पोहनकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार दर्शनाताई बडगे यांनी मानले. सभा यशस्वी करण्याकरीता रमेश खरे, लक्ष्मीताई चौधरी, केशवराव वरखंडे, रामभाऊ खडसींगे, शुभम भुडे, केमदेव वाडगुरे, स्वप्नील मसराम, सुधीर मसराम, सुरेश डफ, गणेश श्रीरामे, दुर्गाताई सातपुते, कल्याणी सातपुते आदीने अथक परिश्रम घेतले.