▫️ट्रस्टचे उपक्रम “श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान” अंतर्गत तनुश्रीला आर्थीक सहकार्य(Financial support to Tanushree under Trust’s initiative “Shrdheya Baba Amte Arogya Abhiyan”)
✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती(दि.11 ऑगस्ट) :- स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर व्दारा समाजाकरीता अनेक योजना उपक्रम अभियान राबवीत आहेत. यात श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन सामाजिक उपक्रम, अनाथाची माय स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना, कै. म.ना. पावडे क्रिडा स्पर्धा तसेच यावर्षी एक नविन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली ती म्हणजे डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, या अंतर्गत विद्यार्थांना शिक्षणाकरीता प्रोहत्सान देणे, विद्यार्थ्यांकरीता शिबीर व्याख्यानाव्दारे सुसंस्कार घडविणे, विद्यार्थांच्या हिताच्या दृष्टीने ट्रस्ट कार्य सुरु केले आहे.
भद्रावती येथील तनुश्री सचिन वाणी ही बारा वर्षाची मुलगी कर्करोगाने ग्रस्त असून तीचे उपचार नॅशनल कॅन्सर इन्सटीटयुट नागपूर येथे सुरु आहेत. तनुश्रीचे पालक मोल-मजुरी करुन आपला प्रपंच चालवतात. बेताच्या आर्थीक परीस्थीती दिवसेनदिवस उपचाराचा खर्च वाढत असल्याने पालकांची चिंतेत वाढ झाली. यातच मंजूषा लेआऊट मधील सुज्ञ नागरीक झनक चौधरी यांनी ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांची भेट घेत कर्करोगाने ग्रस्त तनुश्रीची परीस्थीती सांगीतली सहकार्य करण्याची विनंती केली.
कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी तनुश्रीच्या पालकांना धीर देत मदतीचे आश्वासन दिले. आस्वले यांनी ट्रस्टचे विश्वस्त यांची भेट घेत ट्रस्टचे उपक्रम “श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान” अंतर्गत तनुश्री सचिन वाणी हिला उपचाराकरीता आर्थीक सहकार्य करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, विश्वस्त सुषमा शिंदे, ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना (उबाठा) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, सामाजिक कार्यकते झनक चौधरी, तनुश्रीचे पालक तसेच इतर मंडळी उपस्थित होते.