🔹मॅनेजर , क्यशियर, लिपिक , शिपाई , सर्व कर्मचारी चिमुकले विद्यार्थी.
✒️चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.16 जानेवारी) :- चिमुकल्यांची अशी ही बँक ; मॅनेजर, कॅशियर, लिपिक आणि शिपाई, सारेच चिमुकलेच …..!
असं काहीतरी नव करायचं की ज्यातून विद्यार्थ्यांच्या माईंड डेव्हलप होऊ शकतो. असं स्वप्न बाळगणारा क्रिएटिव्ह विचारधारेचा अधिकारी लाभला तर त्याच्या सकारात्मक प्रयोगाची उंची किती मोठी असते याच्या प्रत्यय चंद्रपूरकर अनुभवत आहेत. जिल्हा परिषदेचे सिओ विवेक जॉन्सन यांनी विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी. सोबतच बँकेचे संपूर्ण व्यवहार विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी अभिनव उपक्रम राबविला.
100 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ” विद्यार्थी बचत बँक ” हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या बँकेतील पूर्ण कर्मचारी विद्यार्थीच आहेत. बँकेचे मॅनेजर, कॅशियार , लिपिक आणि शिपाई सारे विद्यार्थी. बँकेचे ग्राहक विद्यार्थी. बँकेत व्यवहार करणारे विद्यार्थी. जिल्ह्यातील तीन जिल्हा परिषद शाळेमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या या या बँकेची उलाढाल किती ?
विश्वास बसणार नाही मात्र जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पिंपळगाव शाळेत एका आठवड्यात तब्बल 42 हजाराची उलाढाल विद्यार्थ्यांनी केली आहे.तर जील्हाचा शेवटचा टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील पालडोह या शाळेतील बँकेत 14 हजाराचा व्यवहार विद्यार्थ्यांनी केला.या उपक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी झाली. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद बघता, शंभर पटसंख्याच्या वर असलेल्या शाळेत सुद्धा हा उपक्रम भविष्यात राबविल्या जाणार आहे. या उपक्रमाचा नेमका उद्देश काय ? यावर उत्तर देताना विवेक जॉन्सन म्हणाले ” या उपक्रमांचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षर करणे आहे.”
पुस्तकी ज्ञान कितीही असलं तरी, आर्थिक व्यवहार करताना हुशार माणसाची सुद्धा फसगत होते. जिल्हा परिषदने सुरु केलेला हा उपक्रम चिमुकल्यांना बचतीचे महत्त्व पटवून देणारा तर आहे. सोबतच आर्थिक व्यवहार करताना सजग असण्याची हुशारी देणारा आहे. या उपक्रमात आपली मुलं हिरहिरीने सहभाग घेतील याकडे पालकांच्या कल आहे.