चिनोऱ्याच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाच्या अध्यक्षपदी सुरेश कामडी यांची निवड

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.30 ऑगस्ट) :- 

दरवर्षी १५ ऑगस्ट ला महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती ची फेरनिवड ग्रामसभेच्या माध्यमातून करण्यात येते,नऊ सदस्य असलेल्या चिनोरा ग्रामपंचायत ची ग्रामसभा २२ऑगष्ट रोजी आयोजित करण्यात आली होती परंतु ग्रामसभेचा कोरम लोकसंख्येच्या अभावी पुर्ण न झाल्याने सभा तहकूब करण्यात आली तिच सभा २९ ऑगस्ट रोजी गुरुवारी ग्रामपंचायत भवनात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच वंदना अविनाश ढेंगळे ह्या होत्या ग्रामसेवक एकनाथ चाफले, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री निलेश डोंगरकार,छाया कोल्हेकार, मधुकर कोडापे,रेखा आसूटकर,बोथले,ज्योती गायकवाड,व माजी पंचायत समिती सदस्य अविनाश उर्फ चिरकुटा ढेंगळे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सर्वानुमते माजी सदस्य सुरेश कामडी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली व सचिव निमंञक पोलिस पाटील रुपेश ढोके तसेच सदस्य म्हणून अविनाश ढेंगळे, दिवाकर ननावरे,तुळसिदास धानोरकर,ञिशुल निबुदे, गजानन भोयर,तुलसिराम मिलमिले, विजय गायकवाड संतोष सिंह, शंकर कुराडीकर, श्रिमती सुशिला तेलमोरे,रेखा रौतेल,संदिप शेरकी, छाया म्हैसमारे, विकास देठे,व अन्य सदस्याची नियुक्ती करण्यात आली चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत हुडकी खदान, पिपरबोडी (पारधी टोला) चिनोरा,हेलन केलन नगर , वानखेडे लेआऊट,गिरीकुंज कालनी,केशव नगर, पुरुषोत्तम नगर,व अन्य वसाहती आहेत.

गावात देशी दारू,व विदेशी दारूची दुकाने तसेच अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे यामुळे गावात भांडण तंटे नेहमीच होत असते स्थानिक नागरिक आशेने तंटामुक्त समितीचे अध्यक्षांकडे जातात परंतु नैराश्याने परत यावे लागते , कधी कधी दारुड्या नवरोबा सोबत पत्नीचे भांडण नित्यनेमाने होत असते, परंतु पोलीस स्टेशन असे प्रकरण तंटामुक्त समितीकडे वर्ग करतात.