चिनोरा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.26 जानेवारी) :- प्रजासत्ताक दिनानिमित्त चिनोरा येथिल जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमांचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष सिंह, हे होते तर उद्घाटक म्हणून माजी पंचायत समिती सदस्य अविनाश ढेंगळे होते प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच ताई परचाके, माजी सदस्य पञकार धर्मेंद्र शेरकुरे,माजी सरपंच पांडुरंग डोंगरकार , उपसरपंच वंदना ढेंगळे , सदस्य निलेश डोंगरकर,छाया कोल्हेकर, ज्योती गायकवाड,चिनोरा हुडकी च्या शा व्य समिती अध्यक्ष शिलाताई सोनटक्के , पिपरबोडी येथील वनिता पवार, मुख्याध्यापक पिसे, आरोग्य सेविका, स्वराज्य गृपचे अध्यक्ष अजय दवने ,शाळेचे माजी अध्यक्ष गजानन भोयर, विलास देऊळकर, स्वराज्य गृपचे उपाध्यक्ष ञिशुल निबुधे व प्रतिष्ठित नागरिक भवरलाल चौधरी उपस्थित होते, गावात प्रभातफेरी काढण्यात आली व सकाळी झेंडावंदन करण्यात आले, मुलांसाठी स्वराज्य गृपचे वतीने मसाला भात व मिठाई चे वाटप करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी सर्व प्रथम दिपप्रज्वलन करून परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले.

चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा पिपरबोडी,हुडकी खदान,व चिनोरा या शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये नृत्य, भाषणं कला, वकृत्व स्पर्धा यांचा सहभाग होता अनेक विद्यार्थ्यांना व्यासपीठावर भाषणं देण्यासाठी आमंत्रित केले,कारण भविष्यात विद्यार्थ्यांनी भाषण कलेत प्राविण्य प्राप्त केले पाहिजे, प्रास्ताविकात बोलताना मुख्याध्यापक पिसे म्हणाले सरकार शाळेचे खाजगीकरण करत आहे,याचा विरोध लोकांनी केला पाहिजे तसेच अनिल अंबानी, सुभाष चंद्रा नऊ हजार कोटी रुपयांचे अशा मोठ मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहे आणि जिल्हा परिषद शाळा मोडकळीस येत आहे .

मग ग्रामीण विद्यार्थ्यी घडणार कसे अशी खंत मुख्याध्यापक भुमेश्वर पिसे यांनी व्यक्त केली, तसेच अविनाश ढेंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सहाय्यक शिक्षक सुनील बुरिले यांनी संचालन केले , शिक्षक , शिक्षिका,स्वराज्य गृप व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला चिनोरा वासी मोठ्या संख्येने उपस्थित होते .