🔸दोघे जखमी
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.4 फेब्रुवारी) :- स्थानिक शेगाव बू येथे काल सोमवार च्या सायंकाळी बोलेरो चारचाकी गाडीने दुचाकी ल उडवले असून या अपघातात दुचाकी स्वर दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली . सविस्तर असे की निलेश वसंता पेटकर रा. बेंबळा हा शेगाव येथील आठवळी बाजार भाजीपाला घेण्यासाठी आला होता बाजार घेतल्या नंतर घराकडे जाण्यास निघाला तेव्हा त्याला परसराम चौधरी हा भेटला हे दोघेही दुचाकी वर बसून बेंबळा येथे जायला निघाले शेगाव संपताच चिमूर कडून भरधाव वेगाने येत असलेल्या बोलोरो चारचाकी गाडीने यांना धडक दिली यात हे दोघेही जखमी झाले याची माहिती लगेच शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री योगेंदरसिंग यादव यांना मिळताच .
घटनास्थळावर psi श्री मनीष तालेवार व ट्रॅफिक पोलीस कर्मचारी प्रफुल कांबळे तसेच त्यांचे सहकारी दाखल झाले. व पंचनामा करून आरोपी ड्रायवर ल ताब्यात घेऊन जखमीना उपचार करिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार श्री योगेंदरसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली psi श्री मनीष तालेवार , प्रफुल कांबळे , इतर सहकारी करीत आहे.