चारगाव बु येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.21 सप्टेंबर) :-चला बदल घडवुया अंर्तगत सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन गुरुदृष्टी नेत्रालय,चंद्रपूर च्या वतीने चारगाव बु येथे रविवार दिनांक २२ आॅगष्ट २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उदघाटन मा.दयाराम नन्नावरे सभापती आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.चारगाव बु. यांच्या हस्ते होत असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डाॅ.चेतन खुटेमाटे राहणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणुन अभिजीत पावडे,बाळाजी पडवे,योगेश वायदुळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक मंडळ,परीसरातील सरपंच,गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष हे मान्यवर उपस्थित राहणार असुन सदर शिबीराचा लाभ चारगाव बु या परीसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहान आयोजकांनी केले आहे.