✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.11 फेब्रुवारी) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव राळेगाव परिसरामध्ये आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीने हजेरी लावली असून यात अनेक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह छोट्या मोठ्या गारपीटणे शेतकरी तसेच शेतमजुरांची फार मोठी बिकट अवस्था केली तर अनेक शेतकरी शेतमजूर भर गारपीटीमध्ये तसेच भर पाण्यामध्ये सापडले असल्याने स्वतःचा जीव कसा वाचवायचा यात सर्व नागरिक लागली होती तसेच मिळेल त्या छताखाली निवारा घेत आपला जीव कसा बसा जीव धरून आपले प्राण वाचवीत होता.
अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतात असलेले चना हरभरा, गहू ज्वारी, या सह अनेक पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी दुःखात अडकलेला आहे तेव्हा तात्काळ या परिसराची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी यास शेतमजूर यांनी केली आहे.