🔸अनेक शेती पाण्याखाली
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.28 जुलै) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव बु. चारगाव मध्यम प्रकल्प चारगाव बु. हे धरण गेल्या पाच दिवसापासून ओवर फ्लो झाले असून येणाऱ्या पाण्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून पुराच्या पाण्यात वाढ होत असल्याने चारगाव धरणाच्या इराई नदीवरील पुलावरील पुराची पातळी वाढत आहे.
या पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतजमीन स्थानिक चारगाव बुद्रुक येथील अनेक शेती पाण्याखाली आहे सर्वत्र पहायले असता अनेक शेतामध्ये पाणीच पाणी साचलेले दिसून येत आहे तर स्थानिक चारगाव बु.तसेच चारगाव खुर्द अर्जुनी कोकेवाडा तुकूम धानोलि किन्हाळा अश्या अनेक गावांमध्ये गावापर्यंत पाणी पोहोचत आहे.
त्यामुळे येथील गावातील नागरिक धोका निर्माण करत त्यांच्या शेती पाण्याखाली असल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त आहे जोपर्यंत पाण्याचा कहर कमी होणार नाही तोपर्यंत अनेक शेतकरी हे चिंतेतच राहील त्यासोबत त्यांची शेती नाशवंत होण्याच्या मार्गात राहील पाण्याचा पुराचा कहर कमी होईल तेव्हाच शेतकरी नागरीक स्वतंत्र श्वास घेईल असे दिसून येत आहे.