✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.4 सप्टेंबर) :- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, एम ३ एम फाउंडेशन आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या सहयोगाने चारगाव खु. येथे दूध उत्पादकता क्षमता बांधणी कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम आदिवासी उपजीविका विकास कार्यकम प्रकल्प अंतर्गत आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात विस्तार प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे डॉ. सारीपुत पां. लांडगे, डॉ. गजानन अंभोरे, आणि डॉ. महेश जावळे. तसेच पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश अघडते, कृषी विकास प्रकल्प समन्वयक कुंदन राणे, वनधन शेतकरी कंपनीचे अध्यक्ष सुधीर नन्नावरे, दशरथ देहारकर, इत्यादी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात चारगाव खु. आणि आसपासच्या क्षेत्रातील दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. गजानन अंभोरे यांनी पशूंच्या प्रजनन क्षमतेला वाढवण्यासाठी योग्य तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर कसा करावा, तसेच प्रजनन संबंधित आजारांचे निदान आणि उपचार कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. महेश जावळे यांनी दूध उत्पादनात वाढीसाठी सकस आहाराचे महत्व सांगितले, ज्यामुळे दूध उत्पादन क्षमता आणि पशूंचे आरोग्य सुधारते.
डॉ. सारीपुत पां. लांडगे यांनी दूध उत्पादक पशूंच्या राहण्याच्या जागेचे आणि मुक्त संचार शेडचे व्यवस्थापन कसे करावे यावर प्रकाश टाकला. त्यांचा सल्ला म्हणजे आरामदायक आवास, स्वच्छता, आणि वातावरणीय नियंत्रण यांचे संतुलित व्यवस्थापन करून दूध उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारता येईल.
डॉ. अघडते यांनी शेतकऱ्यांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प अधिकारी अनिल पेंदाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशाल मन्ने यांनी केले.
या कार्यक्रमात केशव मिलमिले , मुख्याध्यापक चंपत डंभरे सहाय्यक शिक्षक, टीम लीडर रोशन माणकर, वाडी प्रकल्प व्यवस्थापक संतोष गुजर, वाडीचे सचिन पाटील, प्रकल्प कृषी अधिकारी प्रबुद्ध डोये ,रमेश चौधरी, तालुका समन्वयक दीक्षांत राऊत, शैलेंद्र वराडे, सौरभ गडाख, प्रफुल जुमडे , राजू गोळघाटे , यांच्यासह इतर मान्यवरांनी सहकार्य केले.