✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.2 डिसेंबर) :- स्थानिक चारगाव खुर्द येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर खनिज विकास निधी अंतर्गत चारगाव खुर्द येथे आरो वाटर एटीएम मशीनचे माननीय श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहाने उद्घाटन करण्यात आले.
स्थानिक चारगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्याने जनतेच्या सेवेकरिता जनतेला व नागरिकांना शुद्ध पाण्याची सोय निर्माण व्हावी याकरिता येथील सरपंच श्री राजेंद्र चिकटे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा चंद्रपूर खनिज विकास निधी अंतर्गत 15 लक्ष रुपये रुपयातून आर. ओ .वॉटर एटीएम शुद्ध पाण्याची मशीन उपलब्ध करून दिली. त्याचाच उद्घाटन सोहळा येथील आमदार श्रीमती प्रतिभाताई सुरेश धानोलकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी येथील सरपंच राजेंद्र चिकटे, सौ सुवर्णा शेंडे उपसरपंच, श्रीमती.वनिता कष्टी सदस्य, सुनीता पावडे, दुर्गेश पावडे, सिद्धार्थ गायकवाड, सखुबाई शेंडे इत्यादी सदस्य उपस्थित होते .यासोबत सुलखा दडमल, संजय चौवले,सचिन लांडे सचिव, अभय भाऊ धोबे ,मनोहरजी शिरसागर ,प्रकाश कष्टी ,शरद मोडक, सचिन चौवले ,मारुती जुनारकर ,वीणाताई मिसाळ, बबन एकरे व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.