✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravti प्रतिनिधी)
भद्रावती(दि.13 मार्च) :-तालुक्यातील चंदनखेडा ग्रामपंचायत मध्ये येत असलेल चरुर (धा) या गावातिल कवडुजी क्षिरामे व रेखा कवडुजी क्षिरामे हे दोघे पति पत्नी साधारणता १४ वर्षांपासून अलग राहत होते यांच्यातील घरगूती वाद प्रकरण ची तक्रार काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे युवा अध्यक्ष मनोहर शालिक हनवते यांच्याकडे आली.
या प्रकरणाची तात्काळ गांभीर्याने दखल घेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती चंदनखेडा चे अध्यक्ष मनोहर शालीक हनवते यांनी स्वतः पुढाकार घेऊन व सोबत पदाधिकारी सहकारी यांना सोबत घेऊन क्षिरामे पति-पत्नि ला व्यवस्थीत समजदारीने समजावून वादग्रस्त प्रकरण मिटविण्यात आले .
यावेळी दिलीप कुळसंगे,दुर्गा केदार, पोलिस पाटील चरुर (धा),व ग्रामपंचायत सदस्या आशा नन्नावरे, सामाजिक कार्यकर्ते विध्याधर मेश्राम, उमाकांत केदार यांच्या उपस्थिती व सहकार्याने घरगुती वादग्रस्त प्रकरण वाद मिटवण्यात आले यावेळी ग्रामवासी उपस्थित होते.तं.मु.स.अध्यक्षाच सर्वत्र ग्रामवासी व परिसरातील नागरिक कौतुक करित आहे.