चंद्रशेखर भिवदरे यांची त. मु.अध्यक्ष पदी निवड

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.8 सप्टेंबर) :- येथुन जवळच असलेल्या ग्राम पंचायत शेगाव खुर्द ची ग्रामसभा नुकतीच पार पडली यात महात्मा गांधी गाव तंटामुक्त समिती च्या अध्यक्ष पदाची निवड करण्यात येत असल्यानं अनेककानी आपली इच्छा शक्ती दर्शवली तेव्हा गावातील प्रतिष्ठित नागरिक संबोधल्या जाणाऱ्या श्री चंद्रशेखर भिवदरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी ग्राम पंचायत शेगाव खुर्द चे सरपंच श्री मोहित लभाने यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली यावेळी ग्रामसेवक शिरपूरकर साहेब ,विकास हजारे, अनुप नन्नावरे, अनंता गायकवाड , बाबुलालजी आत्राम , लक्ष्मण गायकवाड आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.