चंद्रपूर विधानसभेसाठी आता कॉग्रेस पक्षाकडून कुणाल नितीन राऊत यांची वर्णी 

🔸आगामी होऊ घेतलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा पाश्वभूमी चंद्रपूर विधानसभेसाठी कुणाल राऊत यांची उमेदवारी निश्चित होण्याचे संकेत 

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि. 11 सप्टेंबर) :- आगामी होऊ घेतलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात कॉग्रेस कडून सक्षम उमेदवार म्हणून कुणाल राऊत यांची वर्णी लागणार असे चित्र या sc राखीव सीट साठी दिसून येत आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विदर्भासोबत संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा पक्षाची घणघनीत हार पाहता आता चंद्रपूर विधानसभेत कॉग्रेस पक्षाकडून कुणाल राऊत यांच्या सारख्ये खंबीर नेतृत्वा असणारे निवडणूक रींगणात उतर्वत असल्याची चर्चा चंद्रपूर जिल्हात होतांना दिसत असून यंदाच्या 2024 वर्षातील विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसकडून अनेक नवीन दावेदार आपली दावेदारीसाठी पक्षा प्रमुखकडे वाऱ्या करत आहे.

पण आता कुणाल नितीन राऊत हे या सर्वाना मागे पाडून कॉग्रेसची दावेदारी निश्चित करणार हे नक्की. युवा नेता म्हणून 2007 साली कॉग्रेस NSUI मध्ये प्रवेश करत त्यांनी युवा वर्गासाठी अनेक कार्य केले त्यानंतर नागपूर जिल्हा अध्यक्ष पासून तर युथ कॉग्रेस जनरल सेक्रेटरी ते महाराष्ट्र युथ कॉग्रेस अध्यक्ष प्रयत्न जात सामाजिक कार्य करत समाजसेवा केली. राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वात त्यांनी भाजपा सरकार विरोधात अनेक आंदोलनही केली.

सरकार मधील भ्रष्टाचार बाहेर कडून आपले वर्चस्व पक्षा प्रमुखांकडे बनवून ठेवले. महाराष्ट्र प्रदेश युथ कॉग्रेस अध्यक्ष असल्यामुळे ते राहुल गांधी यांचा अधिक निकट वरतीय म्हणून एक वेगळी ओडख आहे.तर अश्या खंबीर युवा नेतृत्वाला चंद्रपूर राखीव विधानसभा निवडणुकीत वर्णी लगणार अशी आशा चंद्रपूर युथ करत आहे.