चंद्रपूर विधानसभा उमेदवार सुरेश मल्हारी पाईकराव यांचा भुमीपुत्र परिवर्तन संवाद मेळावा संपन्न

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.6 ऑक्टोबर) :- सफेद झंडा कामगार संघटना, शिवरत्न सेना यांच्या माध्यमातून भुमीपुत्र परिवर्तन शक्ती जिल्हा चंद्रपूर आघाडी स्थापन करण्यात आली.

या भुमीपुत्र परिवर्तन शक्तीचा माध्यमातून चंद्रपूर विधानसभा क्षेत्र 71 निर्वाचित क्षेत्रामधुन सुरेश मल्हारी पाईकराव यांची अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली. 

या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामधुन सुरेश मल्हारी पाईकराव हे उमेदवार आहेत हे नक्की झाले आहे. 

निवडणूक जवळ आल्याने घुग्घुस, चंद्रपुर व आजुबाजुचा गावाला पाईकराव यांच्या भेटी गाठी व मिटिंग जमीन पातळीवर सुरुच आहे. आज 6 आक्टोंबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह लुंबुनी नगर घुग्घुस येथे भुमीपुत्र परिवर्तन संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या संवाद मेळावा मध्ये सहकार्यांना निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या काय करावे लागेल याची सुध्दा भुमिका सुरेश मल्हारी पाईकराव यांनी यांनी मांडली. 

संवाद मेळाव्यात शेकडोचा संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी पाईकराव यांना परिपूर्ण सहयोग करण्याचे आश्वासन सुध्दा दिले. आभार प्रदर्शन करत मेळाव्याची सागता करण्यात आली .

यावेळेस शिवरत्न सेना अध्यक्ष प्रदीप उमरे, शरद मल्हारी पाईकराव, सुरज बांदुरकर, यशवंतराव वैध, बबन वाघमारे, विजय कवाडे, जगदीश मारबते राकेश पारशिवे आदी उपस्थित होते.