🔸वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात
✒️चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.22 जानेवारी) :- मागील दोन दिवसांत दोन वन्यप्राण्यांचा रस्ता आणि रेल्वे मार्गावरील अपघातात मृत्यू झाला. मामला फाटा नजीक चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्ग 930 वर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी हरणाचा मृत्यू तर एक दिवसाआधी जुनोना वनपरिक्षेत्रात बल्लारशाह-गोंदिया रेल्वेच्या अपघातात सांबर प्राण्याचा मृत्यू झाला, या घटना वनविकास महामंडळ च्या वनपरिक्षेत्रात घडल्या असून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने लवकरात लवकर पाऊल उचलून वन्यप्राण्यांचे अपघाताचे सत्र हे कसे थांबवता येईल, याकडे लक्ष देणं गरजेचे झाले आहे.
चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्ग 930 वर वन्यप्राण्यांचे अपघाताचे सत्र सुरूच आहे, अनेक वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागला आहे, मामला फाट्यावरून काही दिवसापूर्वी एका वाघाने रस्ता ओलांडण्याचे विडिओ वायरल झाले होते, त्याच भागात मादी हरणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दवी मुत्यू झाला.
अपघात एवढा भीषण होता कि मादी हरणाच्या गर्भातील गर्भ पिशवीमध्ये असलेला पूर्ण वाढीचा पिल्लू सुद्धा मृत्युमुखी पडला. मामला वनपरिक्षेत्राचे वनविकास महामंडळाचे अधिकारी आत्राम यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पण मादी हरणाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आत्राम, बुराडे, स्वामी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे व सदस्य अंकित बाकडे उपस्थित होते.