✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.१४ एप्रिल) :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल रोजी सकाळी मनपा मुख्यालयात मनपाचे आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहली. याप्रसंगी आयुक्तांनी भारतीय संविधानाचे महत्व अधोरेखित केले. यानंतर उपस्थीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने भारताच्या संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
याप्रसंगी मनपाचे उपायुक्त श्री. अशोक गराटे, उपअभियंता श्री. अनिल घुमडे,डॉ.अमोल शेळके, श्री. अनिल बाकरवाले,श्री.प्रदीप पाटील,श्री.विकास दानव,श्री.अनिल बनकर,श्री.आशिष जिवतोडे,श्री.चॅनल वाकडे,श्री.प्रतीक दानव,श्री.अनिरुद्ध राजुरकर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर आयुक्तांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. मनपाच्या सर्व शाळांमधेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेत भाषण, गीत गायन, भीम गीत नृत्य व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.