✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.12 नोव्हेंबर) :- जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीक रोगांच्या प्रादुर्भावामुळे संपल्यात जमा झाले. हा रोग झपाट्याने पसरत असल्या- ने शेतकर्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे जोमात आलेले सोयाबीन पीक ऐन जोमात असताना नुकत्याच आलेल्या अनोळखी रोगाला बळी पडले आहे.या रोगाची लक्षणे झाडे पिवळी पडणे व संपूर्ण झाड वाळत जाणे हे दिसून येत.यामुळे शेतकर्यांच्या हातात आलेले पीक जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे .
या पिकांची उपाययोजना संदर्भात पांढरी माशी च्या प्रभा- वामुळे करप्या रोग वाढत असुन बुरशीजन्य रोग आणि पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडून सुकून गेले होते.त्यामुळे शेतकरी या रोगामुळे व पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा द्या अशी मागणी उमरे यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आधी पावसामुळं पिकांचे नुकसान तर आता सोयाबीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी राजा संघटात सापडला आहे.सरकारणे काही जिल्हात अग्रीम पिक विमा दिली तर त्यात चंद्रपूर जिल्हा वगळण्यात आला आहे.पण मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.सोयाबिन उत्पादन हेक्टरी २-३पोते उत्पादन झाले आहे.सोयाबिन उत्पादन हे नाही च्या बरोबर झाले आहे.तरी सरकार ने अग्रमी पिक विमा पासून चंद्रपूर जिल्हा कसा काहा वगळण्यात आला असा प्रश्न ?प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केला आहे.
शेतकरी राजाची आर्थिक परिस्थिती खालावली असून निसर्ग सुध्दा घात करतोय. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगांची गळती होत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रमी पिक विमा देण्याची मागणी प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे