चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असफल…शेतकरी नेते किशोर डुकरे यांची जाहीर टीका 

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.29 ऑगस्ट) :- मागील वर्षी सोयाबीन वर आलेले रोग वर तसेच अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्ष अगोदर शेतकऱ्यांना पीक संरक्षण म्हणून पिक फसल विमा योजना आणली. या योजनेमध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या पिकाचा संरक्षण विमा काढला.

मात्र सरकार आणि कंपनी झालेल्या नुसकांनी मुळे उदासीन असल्याने वरोरा तालुक्यातील शेतकरी नेते शेतकरी पुत्र यांनी प्रशासन आणि कंपनी विरोधात अनेक आंदोलन करून शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा म्हणून आग्रह धरला. त्यांचे आंदोलनाचे फलित म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे पण मिळाले मात्र याची श्रेय जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी घेऊन उर्वरित रक्कम 31 ऑगस्ट पर्यंत देऊ असे शेतकऱ्यांना सांगितले.

 शेतकरी 31 ऑगस्ट च्या प्रतीक्षेत शेतकरी राजाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला असून जिल्हाचे पालकमंत्री यांच्या शब्दाकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे. आज जगाचा पोशिंदा हक्काच्या मोबदल्यासाठी प्रतीक्षेत असेल तर जिल्ह्याचे पालकमंत्री शेतकरी ची प्रश्न सोडवण्यासाठी असफल ठरत आहे अशी जहरी टीका शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी केली आहे.

 शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी पालकमंत्री यांना थेट फोन करून पिक विमा ची माहिती दिली असता त्यांनी सर्व शेतकरी यांना 31 ऑगस्ट पर्यंत आम्ही पैसे देऊ असे आश्वासन दिल्यानंतर ते पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नसल्यामुळे शेतकरी नेते किशोर डुकरे हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा कळाले असून पालकमंत्र्यांना टार्गेट करताना दिसत आहे.