चंद्रपूर जिल्ह्य़ातील बेरोजगाराला महिण्याला दहा हजार रुपये भत्ता द्या 

🔸सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक /अध्यक्ष – सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर 

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.15 जुलै) :- जागतिक युवा कौशल्य दिना निमित्ताने सफेद झंडा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचा वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब जिल्हा चंद्रपूर यांना मागणी करण्यात आली .

जिल्हा चंद्रपूरतील युवक व युवती जे सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांना रोजगार मिळेपर्यंत महिन्याला त्यांची आवश्यक मुलभूत जीवन खर्च भागविण्यासाठी भत्ता देण्यात यावा. सुशिक्षित बेरोजगारांना पूर्वी मिळणारा बेरोजगारी भत्ता सरकारने बंद केलेला आहे. तो पुन्हा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासन दरबारी मागणी करावी. सुशिक्षित बेरोजगारांना महिण्याला त्यांचे शिक्षण पाहुन भत्ता उपलब्ध करून . भत्ता खालील प्रमाणे देण्यात यावा .

           बारावी उत्तीर्ण – 6,000/-रुपये 

आय.टि.आय/ पदविका – 8,000/-रुपये 

     पदवीधर/ पदव्युत्तर – 10,000/-रुपये 

हा भत्ता त्यांना त्यांच्या मुलभूत गर्जा किंवा रोजगार मिळेपर्यंत वयाचा 40 वर्षापर्यंत महाराष्ट्र शासनाकडून भत्ता देण्यात यावा. 

             आपल्या जिल्ह्यातील सेवायोजन कार्यालय (Employment Exchange) जवळपास बंद झालेले आहे. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधून पूर्वी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायच्या, त्या आता होत नाहीत. कौशल्य विकास विभाग किंवा अन्य विभागांमार्फत बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात यावी. आपल्या जिल्ह्य़ातील शासकीय कार्यालयामध्ये ज्या ज्या जागा रिक्त आहेत, त्या त्या जागेवर कंत्राटी कामगारांच्या ऐवजी शासकीय भरती करण्यात यावी. तसेच खासगी कंपन्यांसाठीही काही नियम करून एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये ज्या बेरोजगारांनी नोंदणी केली आहे, त्यांना प्राधान्यानं नोकरी देण्याची व्यवस्था करावी.        

              जिल्हा चंद्रपूर करता खास नोकरी पोर्टल तयार करावे शासकीय, निमशासकीय सोबत तिथं विविध उद्योग-आस्थापना यांची नोंदणी करून घेवून ज्या बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली आहे त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्यात यावी.  

            आमच्या वरील मागणीवर आपण लवकरात लवकर अंमलबजावणी करुन सुशिक्षित बेरोजगार तरुणांना बेरोजगार भत्ता व रोजगार उपलब्ध करून द्यावा.

अशी मागणी आज सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक / अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटनेचा वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.