🔹सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक अध्यक्ष सफेद झेंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर
✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर (दि.19 जुलै) :- सफेद झंडा कामगार संघटनेचा वतीने जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील इयत्ता बारावी पर्यंत शिकलेल्या मुला /मुलींच्या मोफत उच्च शिक्षणासाठी अनुदान देण्यात यावे.
आत्महत्याग्रस्त पिडीत शेतकरी कुटूंबातील गरजू विद्यार्थी /विद्यार्थीनी यांची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते परंतु त्यांच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्याने ते उच्च शिक्षण देवू किंवा घेऊ शकत नाही ते हतबल होतात. त्यामूळे त्यांच्या घरातील पाल्य शिकत नाहीत. कुटूंबकर्ता घरात नसल्याने कुटूंबातील पुढची पिढी सैरभैर होतात. योग्य मार्गदर्शन व शैक्षणिक पुर्ण व्यवस्था त्यांना उपलब्ध होत नाही.
तरी जिल्हाधिकारी यांच्या वतीने त्या विभागातील संक्षम अधिकार्यांनी त्या मुलांचे पालकत्व स्विकारुण त्यांना शिक्षणाकरिता मार्गदर्शन व सेवा सुविधा उपलब्ध होतील असे पहावे. तसेच 12 वी नंतर ज्यांना जो पर्यंत शिकायचे आहे तोपर्यंत शैक्षणिक खर्च व सेवा सुविधा आपण शासनाची नैतिक जबाबदारी म्हणून स्विकारावी व त्या अनुषंगाने योग्य तो पाठपुरावा करून आपल्या चंद्रपूर जिल्हय़ातील आत्महत्याग्रस्त कुटूंबाला व मला कोणते अधिकारी पालक म्हणून नेमले आहेत याबाबत सविस्तर माहिती द्यावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदन सादर करतांना संस्थापक अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर सुरेश मल्हारी पाईकराव, धर्मेंद्र शेंडे, बबन वाघमारे आदी उपस्थित होते.