🔸विद्यार्थ्यां करीता शिक्षणा बरोबर खेळाचे अत्यंत महत्वाचे स्थान.- मा.श्री. हिराजी कन्नाके,चंद्रपूर(The very important place of sports along with education for students – Mr. Hiraji Kannake, Chandrapur)
✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.29 मे ) :- क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर द्वारा आयोजित चंद्रपूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 28 मे 2023 ला घेण्यात आली. स्पर्धेत स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
ही स्पर्धा निवड स्पर्धा होती. खेळाडू मधून 4 स्पर्धकाची चंद्रपूर येथे 16 ते 18 जून होणाऱ्या राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड करण्यात आली. यामधे
प्रथम क्रमांक परिनिता अर्डे, द्वितीय आभा फलके, तृतीय सुनिधी निर्वाण तर चतुर्थ अश्विनी अंबाला यांनी पटकाविले.
प्रथम व द्वितीय विजेत्यांना राज्य बुद्धिबळ स्पर्धा फी करीता प्रत्येकी हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली. तसेच तृतीय व चतुर्थ विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटक मा. श्री. हिराजी कन्नाके यांनी सफेद मोहरा चालवून उद्घाटन केले. कार्यक्रमाचे आयोजन व मुख्य आरबीटर मा. नरेन्द्र कन्नाके सर व कुमार कनकम सर यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका सहज पूर्ण केली. कार्यक्रमाला आयोजित करण्यास नरेंद्र कन्नाके (सहायक शिक्षक,नेहरू विद्यालय शेगाव बूज .),यांनी अथकपणे प्रयत्न केले.स्पर्धा यशस्वी झाल्या बद्दल प्राचार्य मा.माहोरकर सर, मा बी.सी. नगराळे सर यांनी व अध्यक्ष मा.आश्विन मुसळे सर या सर्वांनी अभिनंदन केलेले आहे.