चंद्रपूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

🔸बुद्धिबळ खेळाचा उपयोग शिक्षण क्षेत्रातही करता येतो…मा. नरेन्द्र कन्नाके, आंतराराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू

✒️ धर्मेंद्र शेरकुरे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि .29 जून) :- क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर द्वारा आयोजित चंद्रपूर जिल्हा अंडर 17 निवड बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 29 जून 2024 ला सोमया पॉलिटेक्निक, वडगाव, जिल्हा चंद्रपूर येथे घेण्यात आली. स्पर्धेत स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बक्षिस वितरण मा.श्री. पांडुरंग आंबटकर अध्यक्ष (सोमय्या एज्युकेशन सोसायटी,चंद्रपूर) यांचे हस्ते विजेत्यांना सन्मान चिन्ह व मेडल देऊन गौरविण्यात आले. सरावा शिवाय यश संपादन करता येत नाही असे बहुमूल्य मत अध्यक्ष महोदयांनी व्यक्त केले.

      ही स्पर्धा निवड स्पर्धा होती. अंडर 17 बुद्धिबळ स्पर्धा मधून 2 मुले व 2 मुली राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड करण्यात आली. 

अंडर 17 मुली मद्ये आभा फलके प्रथम,परिनिता अर्डे द्वितीय , प्रिन्सी बारई तृतीय, तर अंडर 17 मुला मधे हेरंब निर्वाण प्रथम, दर्शित जैन द्वितीय ,रियांश सेनग्राप तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले.

प्रथम व द्वितीय विजेते मुंबई येथे होणाऱ्या राज्य बुद्धिबळ स्पर्धा मधे सहभागी होणार आहे. त्याच बरोबर बेस्ट अंडर 7,9,11,13 यांना सुध्दा मेडल देण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चे अध्यक्ष श्री. अश्विन मुसळे सर उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे आयोजन व मुख्य आरबीटर मा. नरेन्द्र कन्नाके सर यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका सहज पूर्ण केली. स्पर्धा यशस्वी झाल्या बद्दल क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर चे कुमार कनकम सर, सर्व उपस्थित पालक, कोच, या सर्वांनी अभिनंदन केलेले आहे.