चंद्रपूर जिल्हा खुले निवड बुद्धिबळ स्पर्धा चंद्रपूर येथे संपन्न

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.15 जुलै) :- क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर द्वारा आयोजित चंद्रपूर जिल्हा खुले निवड बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 14जुलै 2024 ला सोमया पॉलिटेक्निक, वडगाव, जिल्हा चंद्रपूर येथे घेण्यात आली. स्पर्धेत स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बक्षिस वितरण मा.डॉ. बोबडे तसेच मा. डॉ. मनोज शाहू यांचे हस्ते विजेत्यांना सन्मान चिन्ह व मेडल देऊन गौरविण्यात आले. सरावा शिवाय यश संपादन करता येत नाही असे बहुमूल्य मत अध्यक्ष महोदयांनी व्यक्त केले.

      ही खुली निवड स्पर्धा होती. या बुद्धिबळ स्पर्धा मधून 4 खेळाडू राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड करण्यात आले. 

 प्रथम सार्थ बुजाडे द्वितीय, हेरंब निर्वाण,तृतीय संघर्ष आवले तर विपुल तामटकर चतुर्थ पुरस्काराचे मानकरी ठरले.

प्रथम व द्वितीय विजेते जळगाव येथे होणाऱ्या राज्य बुद्धिबळ स्पर्धा मधे सहभागी होणार आहे. त्याच बरोबर बेस्ट अंडर 7,9,11,13 यांना सुध्दा मेडल देण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मा. राहुल अर्डे, मा. मंगेश चहारे, मा. सहारे मा. पैठणे, मा. पौर सर तसेच प्रशिक्षक नयन रामटेके उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे आयोजन मुख्य आरबीटर मा. नरेन्द्र कन्नाके सर यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका सहज पूर्ण केली. स्पर्धा यशस्वी झाल्या बद्दल क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर चे मा. आश्विन मुसळे, मा. कुमार कनकम सर, सर्व उपस्थित पालक, कोच, या सर्वांनी अभिनंदन केलेले आहे.