चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था मर्या.शाखा चिमूर युरिया खताची अव्वाच्या-सव्वा दराने केली जाते खताची विक्री सर्रास शेतकऱ्याची लुट

🔸कृषी विभाग जाणीवपूर्व दुर्लक्ष करत असल्याचा?शेतकरी नेते विनोद उमरे यांचा आरोप 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.22 डिसेंबर) :- चिमूर तालुक्यात युरिया खतात कृषी दुकानदार कडून शेतकऱ्यांची लुट थाबवा कृषी विभागाणे जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकरी नेते विनोद उमरे यांची मागणी रब्बी हंगामा साठी शेतकरी मोठ्या प्रमाणात युरिया खंत खरेदी करतात.

कृषी दुकानदार युरिया खतांचा तुटवडा दाखवून शेतकऱ्या कडून जास्त पैसे घेऊन लुट करतात पण कृषी विभाग या कडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केले आहे.

 कृषी दुकानदार जास्त पैसे घेते युरिया खताची अव्वाच्या-सव्वा दराने केली जाते खताची विक्री सर्रास शेतकऱ्याची लुट थाबवा. चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था मर्या.शाखा चिमूर परवाना रद्द करा.अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांच्या मागणीची दखल घेत कृषी अधिकारी सरोदे मॅडम यांनी चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था मर्या.शाखा चिमूर चौकशी करुन परवाना रद्द करण्यासाठी पुढील कारवाई कृषी अधिकारी प.स.चिमूर सरोदे यांनी केली आहे.