चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर चंद्रपूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघ चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर यांचे धरणे आंदोलन

✒️ संजय तिवारी चंद्रपूर(Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.3 जुलै) :- 

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यातील सर्व शिधा व रास्त भाव दुकानदाराच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्याची पूर्तता करून धान्य वितरणामध्ये येणाऱ्या अडीअडचणीची सोडवणूक करण्याकरिता राज्य रास्त भाव दुकानदाराच्या संघटनेच्या आव्हानानुसार पहिला भाग दिनांक 27 जून 2024 ला तालुक्या पातळीवर एक दिवसीय धरणा आंदोलन प्रत्येक तालुक्यात देण्यात आले त्याचप्रमाणे दुसरा भाग जिल्हा पातळीवर आज दोन जुलै 2024 ला धरणे आंदोलन देण्यात आले मागील अनेक वर्षापासून स्वस्त धान्य व केरोसीन परवानाधारकाच्या समस्या सोडविण्याकरिता महाराष्ट्र शासन स्तरावर कोणतीही कार्यवाही झालेले नसून एक जानेवारी 2024 ला राज्यात दुकानदारांचा संप आयोजित केला होता.

त्या अनुषंगाने दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी माननीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री महोदय महोदयाच्या उपस्थितीत राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या वेळी राज्यातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या मार्जिन मध्ये पन्नास रुपये इतकी वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती लवकरच या निर्णयाचे अंमलबजावणी करण्यात येईल असे सुतवाच मान्य मंत्रिमहोदयाकडून या बैठकीच्या वेळी करण्यात आले परंतु आज पर्यंत कोणताही निर्णय झालेला नसून या विषयावर चर्चा करण्याकरिता संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत कोणतीही बैठक झालेली नाही.

त्याकरिता राज्यातील रास्त भाव दुकानदाराच्या मार्जिन मध्ये आजच्या मेघा महागाई निदर्शनानुसार किमान शंभर रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करण्यात यावी सदर मागणीच्या पूर्ततेसाठी८ जुलै 2024 रोजी मुंबई येथे एक दिवसीय धरणे आंदोलन धरणे आंदोलन करण्याचे आयोजित करण्यात आलेले आहे व आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक एक ऑगस्ट २०२४ पासून राज्यातील सर्व दुकानदार संपावर जातील धरणे आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकारी अध्यक्ष अविनाश काकडे कार्यकारी अध्यक्ष कौडूजी कुंदावार उपाध्यक्ष नानाजी तुपट विठ्ठल रावजी येडे सचिव प्रदीप मीरालवार सुरेश अहिरकर जी बबनराव वाळाई रमेश गायकवाड नीरज प्रकाश जिपकाटे संजय पाटील बबन दानव विकासजी शर्मा बबन डोंगरे भास्कर जी माकोडे योगीराज गादेवार विठ्ठल पाल मंगेश गुरनुले प्रभाकर मोहितकर नामदेव कांबळे विजय पांडुरंग प्रशांत गुंडजवार दिनकर बोरकर सीमा मालखेडे होमदेव बबन बनसोड आनंदराव दातारकर हे मन मानकर शेख रसूल प्रमोद लोहकरे डाखोरी जी दंडलवार जे देव डोंगरेजी दहीकर मुरकुटे कोटरंगे रामसिंग व जिल्ह्यातील इतर दुकानदार हजर होते.