🔹सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक अध्यक्ष – सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर
✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.25 जुलै) :- सफेद झंडा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचा वतीने जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
अनुसूचित जाती (SC)/जमाती(ST), व समस्त नवबौद्ध गोरगरीब हे घटक अद्याप आपल्या पायावर उभे राहिले नसल्यामुळे आणि जे अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमातीST, व नवबौद्ध घटक दारिद्रय़रेषेखालील भुमीहीन, समाजातील विधवा व परित्यक्ता आहेत अशा व्यक्तींना निवडून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टिकोनातून चार एकर कोरडवाहू जमीन व दोन एकर ओलीताखालील जमीन 100% अनुदानावर देऊन त्यांचा उदरनिर्वाह करण्यास मदत करण्यात यावी. अशा गरजु कुटुंबांना आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करून शेत जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा. जमिन उपलब्ध होत नसल्यास आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमून समितीला प्रचलित रेडीरेकनर च्या किंमतीत जमीन खरेदी करण्यासाठी सांगावे.
रेडीरेकनर च्या किंमतीप्रमाणे जमीन उपलब्ध होत नसल्यास जमीनीच्या मुल्याबाबत कोणी जमीन विकणार आहेत अश्या संबंधित जमीन मालकाशी वाटाघाटी करून जमीन उपलब्ध करून त्या जमीनीचे 100%अनुदानावर वाटप करण्यात यावे. जेणेकरून जिल्हय़ातील बेरोजगारी व गरीबी कमी होवून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावेल व परिस्थिती सुधारेल या द्रृढहेतुने सदर विषयात आपण ताबडतोब योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन सादर करतांना सुरेश मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर, राकेश पराशिवे, जगदीश मारबते, बबन वाघमारे आदी उपस्थित होते.