चंदनखेडा येथे विविध कामाचा भूमिपूजन सोहळा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.15 ऑक्टोबर) :- भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथे विविध कामाचे भूमिपूजन सोहळा मा. खासदार श्रीमती प्रतिभा ताई धानोरकर यांच्या हस्ते पार पडला .

 तालुक्यातील चंदनखेडे गाव मोठे असून गावात आदिवासी समाजाची सर्वात मोठी लोकसंख्या आहे सदर समाज बांधवा करिता कोणतीही सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेण्याकरिता सभा मंडप किंवा समाज भवन नसल्याने चंदनखेडा या गावचे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे यांनी माननीय प्रतिभाताई धानोरकर खासदार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्याने या बाबीची दखल घेऊन मौजा चंदनखेडा येथे आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत आदिवासी समाज सभागृह ची बांधकाम मंजूर करून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी भूमिपूजन सोहळा पार पडला.

यावेळी या गावचे सरपंच नयन बाबाराव जांभुळे तसेच उपसरपंच सौ भारतीताई उरकांडे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत काळे श्री सुधीर मुळेवार श्री अनिल चौधरी सुमित मुळेवार बंडू कारमेंगे ईश्वर धांडे यांच्या तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. मुक्ता सोनुले श्री बंडू निखाते सौ रंजना हनवते सौ प्रतिभा दोहतरे सौ श्वेता भोयर सविता गायकवाड श्री नाना बगळे श्री निकेश भागवत सौ आशा नन्नवरे तसेच गावातील समाज बांधव श्री माधव ननावरे विकास नन्नावरे सुशिलाबाई हनवते श्री दशरथजी भरडे तसेच ग्राम काँग्रेस कमिटीचे सदस्य श्री प्रशांत कोहळे श्री रवींद्र जी मेश्राम तसेच इतर ग्रामवासी उपस्थित होते.