चंदनखेडा येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.26 ऑगस्ट) :- चला बदल घडवुया या उपक्रमा अंर्तगत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतु चंदनखेडा येथे दिनांक २५ आॅगष्ट २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात होते.

 या शिबीराला चंदनखेडा , पारोधी , आष्टा, वायगाव, विसापूर,गुडगाव,वडेगाव,चोरा,आष्टी,बेलगांव,आगरा,सागरा,खोकरी,पावना,मुधोली या *गावातील १६९८ नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करुन घेतली.

 या कार्यक्रमाचे उदघाटन मा.समिर पठाण, यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवकन्या चौधरी,धनराज पायघन,मनिषा रोडे,भावना कुरेकार,अनिल चौधरी,भारत जिवतोडे,मनोहर हनवते,सिंगलदिप पेंदाम,निकेश भागवत,मुक्ता सोनुले,संतोष खडतकर,बोबडे गुरुजी,रवि इंगोले हे मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक कामेश कुरेकार, संचालन चंद्रशेखर झाडे,आभार प्रदर्शन अनुप खुटेमाटे यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय ची सर्व टिम मधुकर कुरेकार, दिनेश चौधरी,अभिलाष भागळे,राजु कुरेकार,वैभव उमरे,प्रशिक बागेसर,तौशिफ शेख,दिनेश नखाते,अरोहन बागेसर,नंदु कुरेकार अथक प्रयत्न केले.