चंदनखेडा येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.24 ऑगस्ट) :- चला बदल घडवुया अंर्तगत सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन गुरुदृष्टी नेत्रालय,चंद्रपूर च्या वतीने चंदनखेडा येथे रविवार दिनांक २५ ऑगस्ट२०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उदघाटन मा.नयन जांभुळे सरपंच चंदनखेडा यांच्या हस्ते होत असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डाॅ.चेतन खुटेमाटे राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन मा.देवकन्या चौधरी,महेश टोंगे,चांगदेव रोडे,भिमराव सांगोळे,बंडू नन्नावरे,धनराज पायघन,शंकर रासेकर,भारती आगलावे,एकनाथ घागी,मंगेश नन्नावरे.

मनिषा रोडे,कल्पना भोंगळे,मोहीत लभाने,स्वप्निल पाणतावणे,गिता मानगुडधे,प्रदिप बोढे,अनिल चौधरी,वंदना दातारकर,भावना कुरेकार,भारती उरकांडे,समिर पठाण,भारत जिवतोडे,मनोहर हनवते,सिंगलदिप पेंदाम हे मान्यवर उपस्थित राहणार असुन सदर शिबीराचा लाभ चंदनखेडा परीसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.