चंदनखेडा येथे भीम जयंती उत्साहात साजरी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.14 एप्रिल) :- आज दिनांक 14 एप्रिल सांसद आदर्श ग्रामपंचायत चंदनखेडा येथे महामानव डॉ . बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात फोटोची पूजन करण्यात आले नंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चंदनखेळा येथे पूजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले नंतर आंबेडकर चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पूजन करून माल्यापण पणपण करण्यात आले.

सदर कार्यक्रमास गावचे सरपंच नयन बाबाराव जाभु ळे . उपसरपंच भारतीताई उरकाडे. ग्रामपंचायत सदस्य नीकेश जी भागवत . नाना बगडे मुक्ताताई सोनुले प्रतिभा दोहतरे. रंजना हनुवते . सविता गायकवाड श्वेता भोयर अशा नन्नावरे बंडू जी निखाते. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आईंच वार मॅडम तसेच शाळेचे सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते.