चंदनखेडा येथे पोषण महासत्ताह कार्यक्रम संपन्न 

✒️ भद्रावती (Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

भद्रावती(दि.14 सप्टेंबर) :- सर्कल चंदनखेडा येथे पोषण महाअंतर्गत येणारा पोषण महासप्ताह हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला माननीय सरपंच साहेब नयन जांबुडे सर, ग्रामपंचायत सदस्य निकेश भागवत सर, चंदनखेडा बीटच्या पर्यवेक्षिका कुमारी पायल शंभरकर, घोडपेठ बीटच्या पर्यवेक्षिका विद्या श्रीरामे आणि जिल्हा परिषद शिक्षिका कुंभारे मॅडम यांची उपस्थिती लाभली… तसेच चंदनखेडा सर्कल अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गरोदर व स्तंदा माता तसेच किशोरवयीन मुली यांची सुद्धा उपस्थिती या कार्यक्रमाला होती.

या पोषण महासप्ताह च्या कार्यक्रमाला स्त्रियांना पोषणयुक्त आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच विविध प्रकारचे पोषणयुक्त प्रात्यक्षिक व अमृत आहार थाळी दाखवून गरोदर व स्तनदा मातेला द्यायचा पोषण युक्त आहार बद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. व किशोरवयीन मुलींना त्यांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल व मासिक पाळीत घेण्यात येणारी विशेष काळजी तसेच आत्मसंरक्षण यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.

व अंगणवाडी ताईंनी प्रबोधनात्मक पथनाट्य घेऊन सुरुवातीपासून गरोदर मातेची घेण्यात येणारी काळजी, पोषण युक्त आहार याचे महत्त्व पटवून कुठलीही स्त्री कुपोषणाला बळी पडणार नाही हा संदेश या नाटकाद्वारे देण्यात आला.