✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.14 जानेवारी) :- नेहरू युवा केंद्र चंद्रपूर युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार शौर्य क्रिडा मंडळ बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट चंदनखेडा यांचा संयुक्त उपक्रम
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे नेहरू युवा केंद्र चंद्रपूर युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार व शौर्य क्रिडा मंडळ बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने १० जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या तीन दिवसीय तालुका स्तरीय विविध जसे की कबड्डी,खो -खो, गोळा फेक, दौंड स्पर्धा,पुरुष व महिलांच्या विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या तीन दिवस चाललेल्या सांघीक कबड्डी स्पर्धेत जय गुरुदेव क्रिडा मंडळ खोकरी संघाने प्रथम क्रमांक पटकावला,तर द्वितीय क्रमांक नेहरू विद्यालय क्रिडा मंडळ चंदनखेडा यांनी तर मुलींच्या खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक नेहरू विद्यालय चंदनखेडा तर द्वितीय क्रमांक जेड.पि.चंदनखेडा यांनी पटकावला . मुलांच्या गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक गणेश गुरुनुले चंदनखेडा यांनी पटकावला.
तर द्वितीय क्रमांक शुभम वसंत बागेसर विलोडा यांना तर तृतीय क्रमांक अमोल गायकवाड विलोडा याला मिळाला. गोळा फेक मुली मधी प्रथम क्रमांक रुपाली राजेश्वरी गोहणे चंदनखेडा हीने पटकवला तर द्वितीय राजश्री राजेंद्र गरमडे तर तृतीय क्रमांक मंगला विनायक गोहणे नी पटकावला.मुलींच्या दौंड स्पर्धेत प्रथम क्रमांक कृतीका वासुदेव दडमल चंदनखेडा हीने पटकवला तर द्वितीय क्रमांक रुपाली राजेश्वर गोहणे चंदनखेडा व तृतीय क्रमांक अमृता सुरेश हनवते हीने पटकावला.मुलांच्चा दौंड स्पर्धेत प्रथम क्रमांक शुभम वसंत बागेसर विलोडा यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक सागर मुरलीधर गुरुनुले तर तृतीय क्रमांक करण मोहृर्ले यांनी पटकावला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना बक्षीस सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.यावेळी माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते, माजी जिल्हा परिषद सदस्य मारोतीजी गायकवाड, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिरखान पठाण, माजी पंचायत समिती सदस्या वनिताताई जांभूळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल चौधरी,माजी उपसरपंच डेव्हिड बागेसर, माजी उपसरपंच चंद्रशेखरजी निमजे, किशोर निखार,राहुल मालेकर,गजेंद्र रणदिवे, विकास दोहतरे, गुलाब भरडे, प्रभाकर दोडके,फिरोज पठाण,सिंगलदिप पेन्दाम, नंदकिशोर हनवते, प्रकाश सोनुले, मंगेश हनवते, राजु मस्के,बंडु पाठक,अवि पुसदेकर,अमृता कोकुडे,लता नन्नावरे, प्रकाश भरडे, यशवंत पुनवटकर, भाऊराव मडावी,आदी समस्त ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते.देविदास चौखे यांनी संचालन केले.तर प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे माजी तालुका समन्वयक आशिष हनवते यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शौर्य क्रिडा मंडळाचे ,राहुल कोसुरकार, शुभम भोस्कर, शुभम जांभुळे, वैभव भरडे,प्रविण भरडे, निखिल वाटेकर,देवानंद पांढरे, अमोल महागमकार, दिलिप ठावरी, देवानंद दोडके, कुणाल ढोक, अनुराग रणदिवे,जित कोकुडे,ओहम कोकुळे, वृषभ दडमल,क्रिश्ना नन्नावरे,केतन दडमल ,ओमकार राखुंडे,बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाचे अध्यक्ष अमित नन्नावरे, गणेश हनवते,शंकर दडमल , मंगेश नन्नावरे, निखिल चौखे,विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळाचे अध्यक्ष महेश केदार, संचित केदार , विशाल सोनुले, मंगेश चौखे, मयुर नन्नावरे,पवन भोस्कर, स्वप्निल दडमल, आदिंनी परिश्रम घेतले.