चंदनखेडा येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी 

🔸समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते यांची प्रमुख उपस्थिती

✒️ भद्रावती (Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

भद्रावती(दि .16 नोव्हेंबर) :- तालुक्यातील चंदनखेडा येथे नेहरू युवा केंद्र चंद्रपूर (युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार)व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच धरतीचे आबा, क्रांतिविर, जननायक, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४९ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी चंदनखेडा येथील समाजपरिवर्तक विठ्ठल रामकृष्ण हनवते यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर शालिक हनवते हे सुद्धा उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमात बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाचे सदस्य गणेश हनवते, मंगेश हनवते, शौर्य क्रिडा मंडळाचे अध्यक्ष आशिष हनवते,शुभम भोस्कर, राहुल कोसुरकार, राहुल मालेकर,माधव दोडके,शालिक दडमल,मिलिंद पांढरे, कुणाल ढोक, अमोल नंदरधने,प्रभाकर दोडके,शरद श्रीरामे, दिलिप कुळसंगे,पंकज दडमल,बंडुजी दडमल, पंकज मानकर, आशिष बारतीने, देवानंद दोडके, स्वप्निल दडमल, प्रमोद राखुंडे,जित कोकुडे, ओमकार राखुंडे, नेहरू युवा केंद्राचे माजी तालुका समन्वयक आशिष हनवते यांच्यासह फार मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते.