✒️ मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)
वाघेडा (दि.16 डिसेंबर) :-भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथिल आदिवासी सहकारी संस्थे मध्ये आधारभूत धान खरेदीचा शुभारंभ करण्यात आला
शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळावा दलाला पासून शेतकऱ्याची होणारी लूट थांबावी या साठी शासन स्थरावरून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. यातीलच एक भाग म्हणजे चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्याचे धान हमी भावाने येथील आदिवासी सहकारी संस्थे मध्ये केले जात आहे
आज दि. 15/12/2022 गुरुवार पासून आधारभुत धान खरेदी चा काटापुजन करून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी *संस्थेचे सभापती मा. भारतभाऊ जिवतोडे, उपसभापती मा.सुमितभाऊ मुडेवार, ग्रा.पं चंदनखेडा सरपंच मा.नयनभाऊ जांभुळे* यांच्या हस्ते करण्यात आले.प्रथम ग्राहक शेतकरी श्री. राजेंद्र धात्रक रा.चंदनखेडा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक मा.रमेशभाऊ शेंबळकर, मा.मनोज आसुटकर,मा.सुरेशभाऊ कुरेकार ,मा.संबाभाऊ चौधरी,मा.रमाकांतभाऊ दोहतरे,मा.महादेवराव जांभुळे,स्रीरंगभाऊ घरत,मा.रविंद्रभाऊ गराटे, मा.शैला चौखे,मा. वनिताबाई जांभुळे, मा.सखुबाई नन्नावरे, संस्था सचिव मा.गुलाब भरडे ,लिपीक दिनेश कोकुडे ,शिपाई मनोहर रंदये तसेच संजय दोहतरे,मन्सराम गरमडे गावकरी नागरिक शेतकरी उपस्थित होते.