🔸विधानसभा क्षेत्रातील हळदी-कुंकु उपक्रम श्रृंखलेतील नववा कार्यक्रम
🔹विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात उपक्रम
✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.1 फेब्रुवारी) :- वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात दिनांक 25 जाने. ते 8 फेब्रु. पर्यंत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर्फे महिलांकरीता हळदी-कुंकु, वाण तसेच महिला स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच श्रृंखलेतील नववा कार्यक्रम भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे आज (दि. 01) ला घोडपेठ-कोंढा जिल्हा परीषद क्षेत्रातील महिला तसेच विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हा परीषद क्षेत्रातील घोडपेठ, चालबर्डी, कचराळा, चपराळा, गुंजाळा, घोट निंबाळा, गोरजा, मोहबाळा, कवठी, तिरवंजा, सायवान येथील महिला मोठया संख्येने सहभाग नोंदविला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना नेत्या रश्मीताई ठाकरे यांच्यासूचनेनुसार, शिवसेना नेते पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनातून, चंद्रपुर-आर्णी लोकसभा निरिक्षक तथा माजी नगरसेवक शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांचे निरीक्षणात, पुर्व विदर्भ सघंटीका तथा प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांच्या संकल्पनेतून, जिल्हा महिला संघटीका नर्मदा बोरेकर यांच्या पुढाकाराने, पूर्व विदर्भ सचिव नीलेश बेलखेड़े, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृ.उ.बा.स. सभापती भास्कर ताजने यांच्या नेतृत्वात, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, युवासेना जिल्हा अधिकारी रोहण कुटेमाटे, युवती सेनेच्या जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे यांचे सहभागाने वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन 80% समाजकारण व 20% राजकारण या भूमिकेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 75, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्नेहसंमेलन सोहळा व मकर संक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत सामाजिक सौहार्द व एकोपा नांदत राहावा व चांगल्या विचाराचे आदान प्रदान व्हावे या हेतूने हळदीकुंकू वाण वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले तसेच महिला आघाडी जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करीत महापुरुषांना माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमास मंचावर भद्रावती कृउबास सभापती तथा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंचावर उपस्थित मान्यवरांसोबतच प्रमुख पाहुणे युवती जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, माजी नगरसेविका सुषमाताई शिंदे, प.स. भद्रावती माजी सदस्या अश्विनी ताजणे, भद्रावती कृ.उ.बा.स. उपसभापती तथा युवतीसेना जिल्हा समन्वयक अश्लेषा जिवतोडे-भोयर, ग्रा.प. कचराळा सरपंचा सिमा कुळमेथे, गुंजाळा सरपंचा प्रिती कोवे, उपसरपंच माया सावरकर, सदस्या माधुरी आवारी तथा शारदा उपरे, कचराळा उपसरपंच छत्रपती एकरे यांनी मार्गदशन केले.
कार्यक्रमास युवासेना जिल्हा अधिकारी रोहन कुटेमाटे, भद्रावती कृउबास संचालक परमेश्वर ताजणे हे प्रमुख पाहुणे तथा सुनिल चौधरी, सुधीर राऊत, प्रमोद येसेकर, विवेक राऊत, सचिन फटाले, सनाबाई गणफाडे, सुमित्रा सुर, विमल फटाले, उज्वला राऊत, सरोज रामटेके, कविता राऊत, तानेबाई परचाके, अरुणा वर्मा, अर्चना साव, सोनाबाई तांदुळकर, विमल निमकर, रेशमा विधाते, सुनिता येसेकर, शिला चौधरी सोबतच डॉ. खंगार, संदीप सुर, धनराज गणफाडे, भाऊराव वनकर, सुनिल चौधरी, प्रमोद येसेकर, गौरव पाटील, विलास मिलमिले, गुणवंत भेउेकर, आशीष्ज्ञ मिश्रा, अविनाश भगत, गणेश घोरपडे तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, गणमाण्य प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरीता भद्रावती महिला आघाडी तसेच भद्रावती कृउबास संचालक विनोद घुगुल, महिला आघाडी पदाधिकारी भावना खोब्रागडे तसेच युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोलाचे सहकार्य केले.
प्रास्ताविक भद्रावती तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांनी तसेच कार्यक्रमाचे संचालन युवतीसेना जिल्हा अधिकारी प्रतिभा माडंवकर तथा आभार प्रदर्शन तालुका संघटीका आशा ताजणे यांनी केले. हर्षोल्लासात घोडपेठ येथे हळदी-कुंकु, वाण वाटप व स्नेहमिलन सोहळा सफलतापुर्वक महिलांचा उपस्थितीत संपन्न झाले.